भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना चांगले प्रदर्शन केले. निर्धारीत 50 षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने 7 बाद 352 धावा केल्या. यात सर्वोत्तम प्रदर्शन केले सलामीवीर मिचेल मार्श याने. सलामीवीर डेविड वॉर्नर, तिसऱ्या क्रमांकावर स्टीव स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन यांनी वैयक्तिक अर्धशतके केली. दुसरीकडे भारतासाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर डेविड वॉर्नर याने 56, तर मिचेल मार्श 96 धावा करून विकेट गमावल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या स्टीव स्मिथ याने 74 धावा करून विकेट गमावली. त्यानंतर फलंदाजीसाठी चौथ्या क्रमांकावर आलेल्या मार्नस लॅबुशेन यानेही 72 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. ऑस्ट्रेलियाची वरची फळी मोठी खेळी करू शकल्यामुळे संघाची धावसंख्या देखील उंचावली. जसप्रीत बुमराह याने 10 षटकात 81 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या. फिरकीपटू कुलदीप यादव यायने 2, तर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. (India need 353 runs to win the third ODI against Australia)
तिसऱ्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा
ऑस्ट्रेलिया – मिचेल मार्श, डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्यूशेन, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, तन्वीर संघा, जोश हेझलवूड
महत्वाच्या बातम्या –
IND vs AUS । जसप्रीत बुमराहचा जुना फॉर्म! घातक यॉर्कर टाकून उडवला मॅक्सवेलचा त्रिफळा
मिचेल मार्श आणि शतकामध्ये भिंत बनला कुलदीप! सलामीवीर फलंदाज ‘नर्व्हस नाईंटी’वर बाद