ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात सध्या पहिल्या फेरीचे सामने सुरू आहेत. मुख्य फेरीला सुरुवात होण्याअगोदर स्पर्धेसाठी मुख्य फेरी दाखल झालेल्या सर्व संघांना प्रत्येकी दोन सराव सामने खेळण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, बुधवारी (19 ऑक्टोबर) सराव सामन्यांच्या ठिकाणी पडलेल्या पावसामुळे तीन पैकी एकही सामना पूर्ण होऊ शकला नाही. यामध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड हा महत्त्वाचा सामना देखील सामील होता.
भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानचा सामना ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर खेळला जाणार होता. भारतीय संघाने आपल्या पहिल्या सराव सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला मात दिली होती. तर, न्यूझीलंडला पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 9 गड्यांनी हरवलेले. या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून आत्मविश्वासाने मुख्य फेरीत उतरण्याचा दोन्ही संघांचा मानस होता. मात्र, ब्रिस्बेन येथे सातत्याने पडलेल्या पावसामुळे या सामन्याची नाणेफेक देखील होऊ शकली नाही.
तत्पूर्वी, याच मैदानावर सकाळी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान असा सामना खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानने 20 षटकात 154 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानसाठी कर्णधार मोहम्मद नबी याने 51 धावांची शानदार खेळी केली. पाकिस्तानसाठी शाहीन आफ्रिदीने 2 बळी मिळवले. त्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र, संघाच्या 19 धावा झालेल्या असताना पाऊस आल्यानंतर खेळ थांबवण्यात आला. पावसाने उघडीप न घेतल्याने अखेर सामना रद्द केला गेला.
याव्यतिरिक्त दिवसातील आणखी एक सराव सामना बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान होणार होता. परंतु, त्या सामन्यातही पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. मुख्य फेरीचा सामन्यांना 22 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
माजी प्रशिक्षकांनी गायले मोहम्मद शमीचे गुणगाण; म्हणाले ‘शाहीन आफ्रिदीपेक्षा…’
केव्हा, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध न्यूझीलंड सराव सामना? एका क्लीकवर मिळवा सगळी माहिती