fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चौथ्या टी२०तही भारताचा न्यूझीलंडविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये विजय; अशी रंगली सुपर ओव्हर

January 31, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0

वेलिंग्टन। आज(31 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात चौथा टी20 सामना येथे पार पडला आहे. रोमांचकारी झालेल्या या सामन्यात निर्धारित 20-20 षटकानंतर बरोबरी झाली. त्यामुळे या सामन्यात सुपर ओव्हर घेण्यात आली. या सुपर ओव्हरमध्ये भारताने विजय मिळवत 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-0 अशी विजयी आघाडी घेतली.

सुपर ओव्हरमध्ये प्रथम न्यूझीलंडने फलंदाजी केली. त्यांनी 1 बाद 13 धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम सिफर्टने 8 आणि कॉलिन मुन्रोने 5 धावा केल्या. तर रॉस टेलर शुन्य धावेवर नाबाद राहिला. या सुपर ओव्हरमध्ये भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने गोलंदाजी केली.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताला 14 धावांचे आव्हान होते. भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुलने फलंदाजी केली. यावेळी भारताकडून केएल राहुलने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. तर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. त्यामुळे भारताला शेवटच्या चार चेंडूत 4 धावांची गरज होती.

पण तिसऱ्या चेंडूवर राहुल बाद झाला. त्यानंतर स्ट्राईकवर आलेल्या विराटने चौथ्या चेंडूवर 2 धावा काढल्या. तर पाचव्या चेंडूवर चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 बाद 165 धावा केल्या होत्या. भारताकडून मनिष पांडेने नाबाद 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर केएल राहुलने 39 धावांची छोटेखानी खेळी केली. न्यूझीलंडकडून इश सोधीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडलाही निर्धारित 20 षटकात 7 बाद 165 धावा करता आल्या. न्यूझीलंडकडून कॉलिन मुन्रो(64) आणि टीम सिफर्टने(57) अर्धशतकी खेळी केल्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

या फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांना टी२०मध्ये दिलाय त्रास
वाचा👉https://t.co/uw8fN2xAza👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND

— Maha Sports (@Maha_Sports) January 31, 2020

"कर्णधार विराट कोहलीने ही तक्रार करणे विचित्र"
वाचा👉https://t.co/bLXErj6q6F👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @imVkohli

— Maha Sports (@Maha_Sports) January 31, 2020


Previous Post

पुन्हा एकदा सुपर ओव्हर! चौथा टी20 सामना बरोबरीत

Next Post

न्यूझीलंड आणि सुपर ओव्हर – असा आहे इतिहास

Related Posts

Photo Courtesy:
Twitter/ICC
क्रिकेट

मोहम्मद हाफिजचा मोठा विक्रम! रोहित, गप्टिल यांचा समावेश असलेल्या ‘या’ खास यादीत झाला समावेश

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

कर्णधारपद सांभाळण्यासाठी रिषभ पंत घेतोय दिल्ली संघातील ‘या’ खेळाडूंची मदत

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Next Post

न्यूझीलंड आणि सुपर ओव्हर - असा आहे इतिहास

टीम साऊथी सुपर ओव्हरमध्ये ठरतोय अनलकी; जाणून घ्या ही नकोशी आकडेवारी

तिरंगी टी२० मालिकेची टीम इंडियाकडून धमाकेदार सुरुवात, इंग्लंडवर मिळवला मोठा विजय

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.