कोणत्याही क्रिकेटपटूचे स्वप्न असते की मैदानावर उतरल्यानंतर आपल्या संघाकडून खेळताना शतक ठोकण्याची कामगिरी करावी. मात्र, शतक ठोकणे हे दिसते तेवढे सोपे काम नसते. शतकी खेळी केल्यानंतर प्रेक्षक आणि संघाकडून मिळणाऱ्या प्रशंसेचे सुख वेगळेच असते. पण, जर एखादा खेळाडू शतकाच्या खूप जवळ असताना म्हणजे ९९ धावांवर बाद झाला, तर त्याला होणाऱ्या दुखा:चा अंदाज कुणालाही लावता येऊ शकत नाही.
तसे पाहिले तर, आजवर जगातील अनेक क्रिकेटपटू वनडे क्रिकेटमध्ये ९९ धावांवर बाद झाले आहेत. पण, आपण त्या भारतीय क्रिकेटपटूंविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांच्या नशीबी हा दुर्भाग्याचा क्षण आला होता. Indian Cricketers Who Have Been Dismissed at 99 In ODI.
६ भारतीयांची ९ शतकं हुकली
वनडेमध्ये सर्वप्रथम ९९ धावांवर बाद होणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू हे भारताचे माजी कर्णधार कृष्णमचारी श्रीकांत हे होते. त्यांच्यानंतर या यादीत दुसरा क्रमांक लागतो ते व्हीव्हीएस लक्ष्मणचा. तर, ‘द वॉल’ राहुल द्रविड हा तिसऱ्या आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा चौथ्या क्रमांकावर आहे.
सचिन झाला आहे तब्बल ३ वेळा ९९वर बाद
चकित करणारी गोष्ट ही आहे की, वनडेमध्ये ४९ शतके करणारा सचिन हा तब्बल ३ वेळा वनडेत ९९वर बाद झाला आहे. सचिन पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका व इंग्लंड संघांविरुद्ध ९९ धावेवर वनडेत बाद झाला होता. तसेच ९९ धावांवर नाबाद राहताना सचिन २००७मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १४३ चेंडू खेळला होता.
विराट- रोहित जोडीचाही आहे यात समावेश
सचिनव्यतिरिक्त भारताचा कर्णधार विराट कोहली आणि हिटमॅन रोहित शर्मा हेदेखील वनडेत ९९ धावांवर बाद झाले आहेत. रोहित २०१६मध्ये सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर विराट कोहली २०१३मध्ये विशाखापट्टनम येथे वेस्ट इंडिजविरुद्ध ९९ वर बाद झाला होता.
सेहवाग राहिला होता ९९वर नाबाद
या ६ क्रिकेटपटूंव्यतिरिक्त भारतीय संघातील कोणताही क्रिकेटपटू वनडेमध्ये ९९ धावांवर बाद झालेला नाही. विरेंद्र सेहवागसारखे अनेक दिग्गज क्रिकेटपटू शतकाच्या जवळ धावा करुन नाबाद पव्हेलियनला परत गेले आहेत. याचे कारण म्हणजे, एक तर सामन्यातील षटके संपणे किंवा सामन्याचा निर्णय झाला असावा. परंतु सेहवाग ज्या सामन्यात नाबाद राहिला त्या सामन्यात सुरज रणदिवने नो बाॅल टाकल्यामुळे सेहवागला शतक करता आले नव्हते. यामुळे मोठा वाद झाला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
‘या’ वादग्रस्त मुद्द्यावर गौतम गंभीर- युवराज सिंग आमने सामने
ब्रेकअपच्या ७ वर्षांनंतरदेखील शेन वाॅर्नला येतेय गर्लफ्रेंडची आठवण;…
जगातील अव्वल दर्जाचा गोलंदाज म्हणतो, या भारतीय फलंदाजाला गोलंदाजी करणे…