---Advertisement---

याला म्हणतात क्रिकेटप्रेम! भारत विरुद्ध इंग्लंड वनडे टीम इंडियाच्या कट्टर चाहत्याने पाहिला डोंगरावरुन

---Advertisement---

भारत हा क्रिकेटवेड्यांचा देश आहे, हे उगीच म्हणत नाहीत. अनेकदा क्रिकेट चाहते क्रिकेटवरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाटी अनोख्या गोष्टी करत असतात. त्यातही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आणि भारतीय संघाचा मोठा चाहता सुधीर कुमार चौधरीचे नाव काही नवीन नाही. तो नेहमीच भारतीय संघाच्या सामन्यांसाठी स्टँडमध्ये उपस्थित असतो आणि भारतीय संघाला प्रोत्साहन देत असतो.

मात्र, सध्या पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या सुरु असलेली तीन सामन्यांची वनडे मालिका प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळली जात आहे. कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे या मालिकेसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

सुधीरने केली युक्ती 

स्टेडियममध्ये जरी प्रेक्षकांना येण्याची परवानगी देण्यात आली नसली तरी सुधीरने एक अनोखी युक्ती वापरली आहे. तो पहिल्या वनडे सामन्यादरम्यान गहुंजे स्टे़डियमपासून काही अंतरावर असलेल्या डोंगरावर जाऊन भारताचा झेंडा फडकात भारतीय संघाला प्रोत्साहन देत होता. यावेळी त्याने नेहमीप्रमाणे शरीरावर तिरंगा रंगवला होता आणि सचिनचे नावही लिहिले होते. डोंगरावरुन भारतीय संघाला प्रोत्साहन देतानाचे फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले असून सध्या हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

https://www.facebook.com/smmmkmm/posts/3999711020117798

पहिल्या वनडेत भारताचा विजय –

वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ६६ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताने इंग्लंडला ३१८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला ४२.१ षटकात सर्वबाद २५१ धावाच करता आल्या.

रोड सेफ्टी सिरिजमध्येही दिसला सुधीर

भारत विरुद्ध इंग्लंड संघात अहमदाबाद येथे पार पडलेल्या टी२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांना हजेरी लावल्यानंतर सुधीर रायपूर येथे झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२१ स्पर्धेसाठी इंडिया लिजेंड्सला प्रोत्साहन देण्यासाठी गेला होता. या संघाचा कर्णधार सचिन होता. तसेच या स्पर्धेचे विजेतेपदही इंडिया लिजेंड्सने जिंकले.

या स्पर्धेनंतर सुधीर पुन्हा भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यांकडे वळला. मात्र पुण्यात कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण पाहाता प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे सुधीरला डोंगरावरुनच सामना पाहाण्यात आनंद मानावा लागला.

https://www.facebook.com/photo.php?fbid=3999682500120650&set=pb.100002368198157.-2207520000..&type=3

काही महिन्यांपूर्वी इंग्लंड चाहत्यानेही केले होते असेच काही

सुधीरच्याआधी एका इंग्लंड संघाच्या चाहत्याने श्रीलंकेमध्ये अशाच प्रकारचे कृत्य केले होते. जानेवारी महिन्यात श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात २ सामन्यांची कसोटी मालिका पार पडली होती. त्यावेळी रॉब लुईस नामक इंग्लंड संघाच्या चाहत्याने तब्बल दहा महिने  इंग्लंडच्या सामन्याची वाट पाहात श्रीलंकेत वास्तव्य केले होते. मार्च २०१९ मध्ये इंग्लंडचा श्रीलंका दौरा निश्‍चित झाला होता, मात्र कोरोनामुळे तो पुढे ढकलण्यात आला. या कठीण परिस्थितीतही संघाला पाठिंबा देण्यासाठी रॉबने श्रीलंकेत राहण्याचा निर्णय घेतला होता.

पण जेव्हा अखेर इंग्लंडचा सामना श्रीलंकेविरुद्ध जानेवारीत झाला तेव्हा देखील प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी नव्हती. त्यावेळी रॉबने गालेच्या किल्ल्यावर जाऊन इंग्लंड संघाला प्रोत्साहन दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

कोहलीच्या ‘त्या’ लाल टी-शर्टमागील रहस्य काय? चाहते लावतायेत मजेदार तर्क

शिट्टी वाजवा मुंबई, आम्ही येतोय! पुण्याच्या ऋतुराजकडून मराठीचे धडे घेत चेन्नईकर मुंबईत खेळण्यासाठी सज्ज

पदार्पणातील दमदार कामगिरीने प्रसिद्ध कृष्णावर कौतुकाचा वर्षाव, ‘या’ दिग्गजांनी थोपटली पाठ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---