ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंनी आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर असताना निवृत्ती घेतलेली दिसून येते. मायकेल बेवन, ग्लेन मॅकग्रा, सायमन कॅटीच, मायकल क्लार्क, मिचेल जॉन्सन अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहता येतील. याचप्रमाणे, अजून एक खेळाडू सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये असताना, कसोटी क्रिकेट गाजवताना अचानक निवृत्त झाला. तो खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू व सलामीवीर ख्रिस रॉजर्स.
याच ख्रिस रॉजर्सविषयी काही रंजक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१) ख्रिस रॉजर्स याला संघ सहकारी “बकी” या टोपण नावाने हाक मारत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात जवळपास सर्वच खेळाडूंची टोपण नावे असत. रिकी पॉंटिंग ला “पंटर”, ग्लेन मॅकग्रा याला “पिजन”, ब्रेट लीला “बिंगा” तर मायकल क्लार्कला “पप” या नावाने ओळखले जाते.
२) रॉजर्स याला रंगअंधत्वाचा आजार होता. आपली संपूर्ण कारकीर्द तो रंगअंधत्व असताना खेळला.
३) रॉजर्स तब्बल चार काउंटी संघांकडून खेळला आहे. डर्बीशायर, नॉर्दम्पटनशायर, लिसेस्टरशायर व मिडलसेक्स या चार काउंटी संघाचे त्याने प्रतिनिधीत्व केले आहे. विशेष म्हणजे, या चारही संघांकडून त्याने द्विशतक झळकावण्याची कामगिरी केली होती.
४) २००५ मध्ये लिसेस्टरशायर कडून खेळताना, आपल्याच देशाविरुद्ध म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते.
५) २००८ मध्ये भारताविरुद्ध पर्थ कसोटीत त्याने पदार्पण केले. त्यावेळी तो वयाची तिशी पार करून गेला होता. कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणारा तो ३९९ वा खेळाडू ठरला.
६) भारताविरुद्ध पदार्पण केल्यानंतर त्याला पुन्हा संधीसाठी पाच वर्षे वाट पहावी लागली. २०१३ च्या ऍशेजसाठी त्याचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आला होता.
७) रॉजर्स पदार्पणापासून सलग ४५ कसोटी डाव शून्यावर बाद झाला नव्हता. त्याला पहिल्यांदा शून्यावर बाद करण्याची किमया इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने केली.
८) रॉजर्सच्या कारकीर्दीतील सर्वोच्च खेळी (१७३) ही त्याच्या अखेरच्या मालिकेत आली. २०१५ ऍशेज दरम्यान त्याने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर ही खेळी साकारली होती.
९) सलग सात सामन्यात अर्धशतक झळकावून बाद होणारा तो पाचवा फलंदाज होता. त्याने या सर्व सामन्यात अर्धशतकाची वेस ओलांडली मात्र, त्याला शतक करता आले नाही.
१०) राॅजर्स ऑस्ट्रेलियाकडून २५ कसोटी सामने खेळू शकला. यात त्याने ४२.८७ च्या सरासरीने २,०१५ धावा काढल्या. त्याच्या ५ नावे आंतरराष्ट्रीय शतके आहेत. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ३१३ सामने खेळून त्याने २५,४७० धावा काढताना तब्बल ७६ शतके झळकावली आहेत.
ट्रेंडिंग लेख –
भल्याभल्या गोलंदाजांना धूळ चारणाऱ्या रोहितची फलंदाजी ‘या’ ४ गोलंदाजांपुढे पडते फिकी
भारतीय ३ विकेटकिपर, जे आयपीएलमध्ये ठरलेत सुपर किंग
तुटपूंज्या किंमत मिळूनही ‘हे’ ५ खेळाडू ठरले आयपीएलमध्ये सुपर डुपर हिट
महत्त्वाच्या बातम्या –
मैदानावर उतरताच ‘हा’ खेळाडू म्हणतोय, आता तुरुंगातून सुटल्यासारखे वाटत आहे…
शोएब अख्तरची ‘या’ खेळाडूवर कडाडून टीका; म्हणाला, तो हरवलेल्या गायीसारखा…
किंग्स इलेव्हन पंजाबसाठी आनंदाची बातमी; हा गोलंदाज गाजवतोय सीपीएल