आयपीएलच्या 16व्या हंगामाची सुरुवात दिनांक 31 मार्च 2023 रोजी होती आहे. सर्वच 10 संघ आयपीएलच्या विजेतेपदासाठी स्पर्धेत उतरणार आहेत. अशात आयपीएलचे व्यवस्थापन देखील अधिक तगडे करण्यासाठी सर्वबाजूंनी प्रयत्न होताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून प्रेक्षकांना जोडून ठेवणारा आणि घरबसल्या मैदानावरील थराराची अनुभूती करुन देणाऱ्या समालोचकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात खास बाब म्हणजे पहिल्यांदाच हिंदीत एक मुळ पाकिस्तान वंशीय परंतू इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू कॉमेंट्री करणार आहे. ( IPL 2023 Hindi Commentator Owais Shah Named In List )
ओवैस शाह 2023 आयपीएलमध्ये समालोचकाच्या भुमिकेत…
समोर आलेल्या यादीनुसार मुळ पाकिस्तान वंशीय परंतू इंग्लंडचा नागरिक आणि माजी खेळाडू असलेला ओवैस शाह 2023 च्या आयपीएलमध्ये हिंदीतून कॉमेंट्री करताना दिसणार आहे. ओवैस आलम शाह याचा जन्म पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कराची शहरात 1978 साली झाला होता, मात्र नंतर तो आणि त्याचे कुटुंबीय इंग्लंजमध्ये स्थायिक झाले. ओवैस शाह याने 2001 ते 2009 या काळात इंग्लंडकडून 71 एकदिवसीय, 17 टी20 आणि 6 कसोटी सामने खेळले आहेत.
Commentators for JioCinema in IPL 2023. pic.twitter.com/0G1tXc7TVo
— Johns. (@CricCrazyJohns) March 29, 2023
खालील चमू करणार आयपीएलमध्ये हिंदीतून काँमेंट्री
ओवैस शाह, झहीर खान, सुरेश रैना, अनिल कुंबळे, रॉबिन उथप्पा, पार्थिव पटेल, आरपी सिंग, प्रज्ञान ओझा, आकाश चोप्रा, निखिल चोप्रा, सबा करीम, अनंत त्यागी, रिद्धिमा पाठक, सुरभी वैद, ग्लेन सलधना
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतातील दिग्गज क्रिकेट प्रशिक्षकाला सेक्स स्कँडलमध्ये अटक, क्लिप व्हायरल होताच आत्महत्येचा प्रयत्न
रोहितला वगळून सूर्या बनणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार? आयपीएल 2023 आधी महत्त्वाचा निर्णय