आयपीएल 2024 मध्ये बुधवारी (3 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना खेळला गेला. विशाखापट्टणमच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने होते. या सामन्यात कोलकातानं दिल्लीचा 106 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरनं निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 272 धावांचा डोंगर रचला होता. प्रत्त्युत्तरात, दिल्ली कॅपिटल्सची टीम 17.2 षटकांत 166 धावांवर ऑलआऊट झाली.
नाणेफेक जिंकून केकेआरनं फलंदाजी करताना आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या रचली. केकेआरकडून सुनील नारायणनं सर्वाधिक धावा केल्या. त्यानं 39 चेंडूंत 7 चौकार आणि षटकारांच्या मदतीने 85 धावांची खेळी केली. नारायणनं फिलिप सॉल्ट (18) सोबत पहिल्या विकेटसाठी 60 धावा जोडून केकेआरला वेगवान सुरुवात करून दिली. त्यानं आंगक्रिश रघुवंशी (27 चेंडूत 54, पाच चौकार, तीन षटकार) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली.
आंद्रे रसेलनं 19 चेंडूत 41 धावा जोडल्या. त्यानं 4 चौकार आणि 3 षटकार मारले. रसेल आणि कर्णधार श्रेयस अय्यर (18) यांनी चौथ्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली. सहाव्या क्रमांकावर आलेल्या रिंकू सिंगनंही शानदार खेळी केली. त्यानं 8 चेंडूत 26 धावांचं योगदान दिलं. रिंकूच्या बॅटमधून एक चौकार आणि तीन षटकार आले. रमणदीप सिंगला केवळ दोन धावा करता आल्या. व्यंकटेश अय्यर 5 धावांवर नाबाद राहिला आणि मिचेल स्टार्क 2 धावांवर नाबाद राहिला.
दिल्लीकडून एनरिक नॉर्किया सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्यानं च षटकांत 59 धावा देत तीन बळी घेतले. इशांत शर्मानं 2, खलील अहमद आणि मिचेल मार्शनं प्रत्येकी 1 बळी घेतला.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसिक दार सलाम, एनरिक नॉर्किया, ईशांत शर्मा, खलील अहमद
कोलकाता नाईट रायडर्स – फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
महत्त्वाच्या बातम्या-
इशांत शर्माच्या यॉर्करवर रसेल तोंडघशीच पडला! आऊट झाल्यानंतची प्रतिक्रिया व्हायरल
सुनील नारायणच्या अंगात आलं! केवळ 21 चेंडूत अर्धशतक, इशांतला एकाच षटकात चोपल्या 26 धावा
कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? दिल्लीविरुद्ध आयपीएलच्या पहिल्याच डावात ठोकलं तुफानी अर्धशतक