IPLक्रिकेटटॉप बातम्या

‘हे’ 11 खेळाडू तुम्हाला रातोरात बनवू शकतात करोडपती! जाणून घ्या SRH Vs MI ड्रीम 11 टीम

अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सकडून पराभव झाला. आता आयपीएल 2024 मध्ये आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असलेली हार्दिक पांड्याची सेना हैदराबादमध्ये पोहोचणार आहे. आयपीएल 2024 चा 8वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल.

मुंबई असो की हैदराबाद, दोन्ही संघांकडे स्टार खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम 11 संघाला तयार करणं निश्चितच अवघड काम असेल. चला तर मग, या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला या सामन्यात तुमच्या नशिबाचं कुलूप उघडू शकणाऱ्या अकरा खेळाडूंची नावं सांगतो.

आजच्या सामन्यात तुमच्याकडे यष्टिरक्षक म्हणून ईशान किशन आणि हेनरिक क्लासेनचा पर्याय आहे. ईशान हा सलामीवीर आहे. त्यामुळे तो पॉवरप्लेमध्ये जलद धावा करून तुम्हाला चांगले गुण मिळवून देऊ शकतो. मात्र, पहिल्या सामन्यातील क्लासेनची फलंदाजी पाहता त्यालाही संघातून वगळता येणार नाही. जर तुम्हाला सुरक्षित खेळायचं असेल तर या दोघांनाही संघात ठेवा.

फलंदाजांमध्ये रोहित शर्माला मिस करण्याची चूक अजिबात करू नका. याचं कारण म्हणजे सनरायजर्स हैदराबादच्या बॉलिंग लाइनअपविरुद्ध रोहितचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. रोहित व्यतिरिक्त मयंक अग्रवाल हा एक चांगला पर्याय असेल, कारण तो गेल्या सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला होता. तुम्ही तिलक वर्मालाही संघात ठेवू शकता. कर्णधार पदासाठी रोहित हा सर्वोत्तम पर्याय असेल.

ॲडम मार्करम आणि हार्दिक पांड्या यांची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड करा. हार्दिकनं गेल्या सामन्यात गोलंदाजीची सुरुवात केली होती. यासोबतच तो तुम्हाला बॅटनंही चांगले गुण देऊ शकतो. मार्करमचा अलीकडचा फॉर्म चांगला आहे. उपकर्णधार म्हणून तुम्ही या दोन खेळाडूंपैकी एकावर पैज लावू शकता.

गोलंदाजीत दोन्ही संघांकडे मजबूत गोलंदाज आहेत. तुम्ही पॅट कमिन्स आणि जसप्रीत बुमराहला कोणत्याही किंमतीत सोडू शकत नाही. कमिन्स तुम्हाला बॅटनंही गुण देईल. त्याचबरोबर बुमराहकडे प्रत्येक सामन्यात विकेट घेण्याची ताकद आहे. याशिवाय भुवनेश्वर कुमारच्या स्विंगची जादू राजीव गांधी स्टेडियममध्ये पाहायला मिळते. तर पीयूष चावला मधल्या षटकांमध्ये प्रभावी ठरतो.

मुंबई विरुद्ध हैदराबाद ड्रीम 11 टीम-

यष्टिरक्षक- हेनरिक क्लासेन, ईशान किशन

फलंदाज- रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, तिलक वर्मा

अष्टपैलू – ॲडम मार्करम, हार्दिक पांड्या

गोलंदाज – जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, पीयूष चावला

महत्त्वाच्या बातम्या-

टी20 क्रिकेटमध्ये हे दुर्मिळच! गुजरातविरुद्ध ऋतुराज-रहाणेचा अनोखा कारनामा

IPL 2024 । ऋतुराजच्या नेतृत्वात सीएसकेचा सलग दुसरा विजय, गुजरातवर 63 धावांनी मात

वय फक्त आकडा! 42वर्षीय धोनीची जबरदस्त डाईव्ह, झेल पकडल्यावर सहकारीही आश्चर्यचकित

Related Articles