अहमदाबाद| इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ला २६ मार्चपासून सुरूवात झाली. म्हणजे तब्बल दोन महिने सुरू असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (२९ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला सांयकाळी आठ वाजता सुरूवात होणार आहे.
या आयपीएल हंगामातील राजस्थान आणि गुजरात या दोन्ही संघाचा आतापर्यंतचा प्रवास पाहिला असता, दोन्ही संघामधील हा सामना रोमांचक होईल, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यांने व्यक्त केले आहे.
गुजरात संघाने २४ मे रोजी क्वालिफायर सामना खेळल्यानंतर त्यांना चार-पाच दिवसांचा आराम मिळाला आहे. तसेच ते घरच्या मैदानावर चाहत्यांसमोर अंतिम सामन्यात जिंकण्याच्याच इराद्याने उतरणार आहेत.
“माझ्या मते अंतिम सामन्यात गुजरातचा संघ राजस्थानवर भारी पडू शकतो. कारण त्यांचा चार ते पाच दिवसांचा आराम झाला असून याचा फायदा त्यांना मिळू शकतो”, असे ‘मिस्टर आयपीएल’ अर्थातच रैना म्हणाला आहे.
“राजस्थानच्या संघाची आणि जोस बटलरची (Jos Buttler) प्लेऑफच्या सामन्यातील कामगिरी पाहता ते पण या सामन्यात गुजरातला काट्याची टक्कर देऊ शकतात. यामुळे हा सामना चांगलाच अटीतटीचा होण्याची शक्यता आहे”, असेही रैना पुढे म्हणाला.
रैनाप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथनेही हा सामना रंगतदार होणार असल्याचे म्हटले आहे. “हा सामना ज्या मैदानावर होणार आहे, ते पाहता एक लाखपर्यंत प्रेक्षक या सामन्याला उपस्थिती राहतील. तर दुसऱ्या क्वालिफायरच्या तुलनेत यावेळी एक वेगळीच ऊर्जा जाणवेल”, असेही स्मिथ म्हणाला.
दोन्ही संघांनी सांघिक कामगिरी केली असून त्याचा विजेता कोण ठरणार हे सांगणे अवघड आहे. गुजरातचा संघ प्रथमच आयपीएल हंगाम खेळत आहे. त्यांनी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात धडक देत सगळ्यांनाच हैराण केले आहे. तर राजस्थानचा संघ १४ वर्षानंतर अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यांनी संजू सॅमसनच्या कर्णधाराच्या जबाबदारीत पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभव झाल्याने निराश न होता, दुसरा क्वालिफायर सामना सहज जिंकला.
पहिल्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानला गुजरातकडून ७ विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते. नंतर त्यांनी अहमदाबादच्या मैदानावर दुसरा क्वालिफायरचा सामना खेळला आहे. यामध्ये त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध तुफान फलंदाजी करत सामना ७ विकेट्सने जिंकला आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राजस्थानच्या ‘या’ जोडीवर मात करू शकले नाही, तर गुजरातसाठी ट्रॉफी जिंकणे कठीण
‘दडपणाखाली होतो, पण त्याच्या प्रेरणादायी शब्दांनी मदत केली’, बटलरने ‘या’ दिग्गजाला दिले यशाचे श्रेय
IPL 2022 | जोस बटलरने पाडला षटकारांचा पाऊस, तर ‘या’ खेळाडूने मारला सर्वात लांब षटकार