वसीम अक्रम क्रिकेटच्या इतिहासातील एक उत्कृष्ट गोलंदाज होता यात शंका नाही. परंतु १९९९च्या विश्वचषकात त्याने असे काही केले होते की, ज्यामुळे अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका केली होती.
बांगलादेश संघाचा माजी क्रिकेटपटू खालिद महमूदने (Khaled Mahmud) बीडी क्रिकटाईमला दिलेल्या खास मुलाखतीत अक्रमवर गंभीर आरोप करत म्हटले की, अक्रमने त्याच्या उंचीवरून (Height) त्याला चिडवले होते.
“मी १९९९ च्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी माझ्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. अक्रम माझ्या गोलंदाजीवर १ षटक खेळला होता. तसेच त्याने स्ट्रेट ड्राईव्ह मारत माझ्या चेंडूवर चौकार ठोकला होता. मी पहिल्या चेंडूपासूनच त्याच्याकडे रागाने पहात होतो,” असे खालिद म्हणाला.
“आमच्या गोलंदाजी प्रशिक्षकाने आम्हाला त्या सामन्यात आक्रमकपणा दाखविण्यास सांगितले होते आणि मी तसेच केले. मी अक्रमविरुद्ध (Wasim Akram) आक्रमकता दाखविली आणि त्याच्याकडे रागाने पाहिले. यानंतर अक्रमने माझा अपमान केला आणि मला म्हणाला की, तू खूप लहान आहेस. यानंतर मी पुन्हा त्याच्याकडे रागाने पाहिले आणि त्याने पुन्हा मला तसेच म्हटले,” असेही खालिद पुढे म्हणाला.
खालिदची उंची एकूण ५ फूट ३ इंच आहे. परंतु याच खेळाडूने त्या विश्वचषकात पाकिस्तानच्या फलंदाजांना चिंतेत टाकले होते. त्या सामन्यात बांगलादेश संघाने ६२ धावांनी पाकिस्तानला पराभूत केले होते.
बांगलादेशने (Bangladesh) प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात २२३ धावा केल्या होत्या. तर या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा (Pakistan) संघ ४४.३ षटकात केवळ १६१ धावांवर संपुष्टात आला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-रोहितच्या २६४ धावांचा विक्रम मोडण्याची क्षमता असलेले ५ खेळाडू
-जर आयपीएल रद्द झाली तर एवढ्या मोठ्या रकमेवर सोडावे लागणार पाणी
-टाॅप बातम्या: ५ अशा बातम्या ज्यांची क्रिकेटवर्तुळात आज आहे मोठी चर्चा