मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या ‘हाय व्होल्टेज’ सामन्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. आयपीएल स्पर्धेत या सामन्याला भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासारखे वळण लागताना दिसून येत असते. अशातच १ मे रोजी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने बाजी मारत ४ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात तुफानी फटकेबाजी करणारा कायरन पोलार्ड सामना विजयानंतर भावुक झाल्याचे दिसून आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना २१८ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून कायरन पोलार्डने ३४ चेंडूत ८७ धावांची खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने ८ लांबच लांब षटकार आणि ६ चौकार लगावले होते. या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने हा सामना ४ गडी राखून आपल्या नावावर केला होता.
हा सामना जिंकल्यानंतर त्याने भावूक होऊन आकाशाकडे पाहून त्याने हात जोडले. यावेळी त्याने नक्की देवाचे आभार मानले कीआपल्या दिवगंत वडीलांना वंदन केले, हे मात्र समजले नाही. प्रत्येक सामना झाल्यानंतर आक्रमक सेलिब्रेशन करताना दिसून येणारा पोलार्ड या सामन्यात शांत दिसून आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
WHAT. A. WIN for the @mipaltan 🔥🔥
Some serious hitting from @KieronPollard55 ( 87* off 34) as #MumbaiIndians win by 4 wickets.
Scorecard – https://t.co/NQjEDM2zGX #VIVOIPL pic.twitter.com/UAb6SYCMQz
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2021
An all-time IPL classic 👏#MIvCSK | #IPL2021 pic.twitter.com/3ltBMbc78B
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 2, 2021
WHAT A MATCH! Take a bow, Polly. Scored Fastest fifty. Moeen Ali & Rayudu played well, but Thakur's over costed us big time. Congrats, MI! Credit to Pollard.💙#MIvCSK pic.twitter.com/USqbjbHXH1
— UrMiL07™ (@urmilpatel30) May 1, 2021
चेन्नई सुपर किंग्ज संघाने उभारला होता २१८ धावांचा डोंगर
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून सलामी फलंदाज फाफ डू प्लेसिसने ५० धावांची खेळी केली होती. तसेच मोइन अलीने देखील ५८ धावांचे योगदान दिले होते. शेवटच्या षटकांमध्ये अंबाती रायुडूने अवघ्या २७ चेंडूत ७२ धावांची खेळी केली होती. २० षटक अखेर चेन्नई सुपर किंग्ज संघाने ४ बाद २१८ धावांचा डोंगर उभारला होता.
पोलार्डच्या वादळी खेळीमुळे मुंबईने मिळवला विजय
चेन्नई सुपर किंग्ज संघाने दिलेल्या २१९ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु ते स्वस्तात माघारी परतले होते. त्यानंतर कायरन पोलार्डने चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने अवघ्या ३४ चेंडूत ८७ धावांची खेळी करत,सामना मुंबई इंडियन्स संघाला जिंकून दिला.