आशिया चषकाच्या (Asia Cup) 15व्या हंगामातील सुपर फोरमध्ये भारताला पाकिस्तान विरुद्ध पराभव पत्करावा लागला. दुबईमध्ये झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या या सामन्याचे पारडे कधी भारताच्या तर कधी पाकिस्तानच्या बाजूने होत होते. मात्र पाकिस्तानच्या फलंदाजांनी उत्तम खेळ करत सामना एक चेंडू शिल्लक राहताच आपल्या नावावर केला. या सामन्यात भारताच्या पराभवाची अनेक कारणे राहिली आहेत.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही विभागांत निराशाजनक कामगिरी केली. भारताच्या या पराभवाचा मुख्य कारण पाकिस्तानचा एक खेळाडू ठरला आहे. ज्याने शाळेनंतरच अभ्यास सोडून दिला. हा दुसरा तिसरा कोण नसून पाकिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद नवाज (Mohammad Nawaz) आहे.
मोहम्मद नवाज याचा जन्म रावळपिंडी येथे झाला. तो रावळपिंडीच्या एफजी बॉयज स्कूलमध्ये शिकत होता, मात्र त्याने क्रिकेटमुळे शाळा सोडली. त्याने सुरूवातीपासूनच एक अष्टपैलू खेळाडू बनण्याची तयारी सुरू केली होती. तो गोलंदाज, फलंदाजाबरोबरच एक उत्कृष्ठ क्षेत्ररक्षकही आहे. त्याने क्रिकेट कारकिर्दीची सुरूवात डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करत केली होती. तो मधल्या फळीत फलंदाजी देखील करत होता. त्याने 16 वर्षाखालील एका स्पर्धेत रावळपिंडीकडून खेळताना सियालकोट विरुद्ध 60 धावा करत 4 विकेट्सही घेतल्या होत्या.
नवाजच्या याच प्रदर्शनानंतर त्याला वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या 15वर्षाखालील स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. वेस्ट इंडिजमधील संथ गतीच्या खेळपट्टीवर मोहम्मदने त्याच्या गोलंदाजीची स्टाईल बदलली आणि तो डाव्या हाताचा फिरकीपटू झाला.
भारत विरुद्ध मोहम्मद नवाजची कामगिरी
नवाजने भारताविरुद्ध दुसराच सामना खेळताना अष्टपैलू आणि सामनाविजयी खेळी केली आहे. त्याने भारताविरुद्धच्या सुपर फोरच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. यावेळी त्याने तिसऱ्या विकेटसाठी मोहम्मद रिजवान याच्या साथीने 41 चेंडूत 73 धावांची खेळी केली. तर त्याने 20 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार फटकारत 210च्या स्ट्राईक रेटने 42 धावा केल्या.
गोलंदाजीतही नवाजने जबरदस्त प्रदर्शन केले. त्याने 4 षटकात 25 धावा देत सूर्यकुमार यादव याला आसिफ अली करवी झेलबाद केले. तसेच त्याने क्षेत्ररक्षण करताना तीन झेलही पकडले. त्याने केएल राहुल, हार्दिक पंड्या आणि दीपक हुड्डा यांचे झेल पकडले.
पीएसएलमध्ये निर्माण केली ओळख
नवाजने 2012मध्ये प्रथम श्रेणीत पदार्पण केले होते. यावेळी त्याने पहिल्या चार हंगामात तीन शतक आणि सात अर्धशतक करत 1440 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने 24.2च्या सरासरीने 44 विकेट्स घेतल्या. यानंतर त्याला पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याने पदार्पणाताच सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
यानंतर नवाजला 2016मध्ये आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानकडून खेळण्याची संधी मिळाली. तर काही महिन्यानंतर त्याने इंग्लंड आणि आर्यलंड दौऱ्यात पाकिस्तानच्या वनडे संघात प्रवेश केला. यानंतर मात्र त्याने मागे वळूनच पाहिले नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी खेळाडूला नाबाद दिल्यामुळे भारतीय चाहत्यांनी घातला गोंधळ, पंचांशी रोहितची चर्चा व्यर्थ
रिषभ की कार्तिक? कोण आहे टीम इंडियाचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक? चाहते विचारतायेत प्रश्न
INDvsPAK | एकट्या अर्शदीपवर फुटलं पराभवाचं खापर, पण रोहितसह ‘हे’ चौघेही राहिलेत व्हिलन