बारामती, २२ ऑक्टोबर २०२३: केंद्र सरकारच्या खेलो इंडिया अंतर्गत सुरू असलेल्या पश्चिम विभाग वुमन्स सायकल लीग स्पर्धेत आज मास स्टार्ट प्रकारात स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत आभा सोमन, साक्षी पाटील, प्रिया दबालिया या महाराष्ट्रातील खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले आणि महाराष्ट्राचे या स्पर्धेतील वर्चस्व राखले.
सब ज्युनिअर गर्ल्स 20 किलोमीटर मास स्टार्टमध्ये महाराष्ट्राच्या आभा सोमनने (34 मि16 से 460) वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. तर, महाराष्ट्राच्या श्रावणी परीट (34 मि17 से 800) हिने रौप्य आणि गुजरातच्या श्रावणी कासार व रिया पटेल (गुजरात 34 मि 18 से) यांनी रजत पदक प्राप्त केले. ज्युनिअर गर्ल्स 30 किलोमीटर मास स्टार्ट प्रकारात महाराष्ट्राच्या साक्षी पाटील(58 मि 46 से 123) हिने अव्वल क्रमांक पटकावत सुवर्णपदक पटकावले. वुमेन इलीट 30 किलोमीटर मास स्टार्ट प्रकारात प्रिया दाबलिया (1 ता 6मि 49 से) वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ भारताच्या व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधार निर्मल तनवर यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी सोलापूरचे आर. डी. सी. दादासाहेब कांबळे, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष श्री. प्रताप जाधव, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव प्रा. संजय साठे, स्पर्धा संचालिका दिपाली पाटील, मुख्य पंच मीनाक्षी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे प्रास्ताविक कल्पेश भागवत यांनी केले, आभार प्रदर्शन राहुल बोर्डे यांनी केले. (Maharashtra players dominate the Khelo India Women’s League tournament)
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे –
सब ज्युनिअर गर्ल्स 20 किलोमीटर मास स्टार्ट – सुवर्ण – आभा सोमन (महाराष्ट्र 34 मि16 से 460),
रौप्य – श्रावणी परीट (महाराष्ट्र 34 मि17 से 800) ,
कांस्य श्रावणी कासार, रिया पटेल (गुजरात 34 मि 18 से)
ज्युनिअर गर्ल्स 30 किलोमीटर मास स्टार्ट –
सुवर्ण – साक्षी पाटील(महाराष्ट्र 58 मि 46 से 123);
रौप्य – स्नेहल माळी (महाराष्ट्र 59 मि21 से 099);
कांस्य- अपूर्वा गोरे (महाराष्ट्र 59 मिनिट 22 से १२०)
वुमेन इलीट 30 किलोमीटर मास स्टार्ट –
सुवर्ण – प्रिया दाबलिया ( महाराष्ट्र 1 ता 6मि 49 से),
रौप्य – आसावरी राजमाने (महाराष्ट्र 1तास 6 मि 50 से.), कांस्य – राधिका दराडे ( महाराष्ट्र 1 तास 7 मि 39 से)
महत्वाच्या बातम्या –
शमी शानदारच! कुंबळेचा मोठा पराक्रम उद्ध्वस्त करत रचला आणखी एक कीर्तीमान
पीसीबीचा नवीन करार जाहीर! माजी कर्णधारालाच केले डिमोट, बाबरला…