Monday, May 23, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू

वाढदिवसाच्या दिवशीच शतक करणारा सचिन केवळ दुसरा खेळाडू

April 24, 2022
in टॉप बातम्या, क्रिकेट
Photo Courtesy: Twitter/ICC

Photo Courtesy: Twitter/ICC


आज (२४ एप्रिल) भारतीय संघाचा माजी कर्णधार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा ४९वा वाढदिवस. सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता ९ वर्षे झाली. तरीही आजही असे अनेक विक्रम आहेत जे फक्त आणि फक्त सचिनच्या नावावर आहेत. त्यातील एक असाही विक्रम आहे जो जगातिल कोणत्याही क्रिकेटपटूला आपल्या नावावर व्हावा असे वाटेल.

वाढदिवसाच्या दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने वयाच्या २५व्या वर्षी वनडेत शतकी खेळी केली होती. कोकाकोला कपच्या अंतिम सामन्यात त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध शारजात १३४ धावांची ही खेळी केली होती. त्यावेळी तो वाढदिवसाच्या दिवशी वनडेत शतकी खेळी करणारा दुसराच फलंदाज ठरला होता.

सचिनपुर्वी त्याचाच मित्र विनोद कांबळीने असा पराक्रम केला होता. वाढदिवसाच्या दिवशी वनडेत पहिल्यांदा शतकी खेळी करण्याचा विक्रम विनोद कांबळीच्याच नावावर आहे. त्याने १८ जानेवारी १९९३ रोजी वयाच्या २१ वर्षी शतक केले होते. त्याने ही शतकी खेळी इंग्लड संघाविरुद्ध केली होती.

सचिननंतर सनथ जयसुर्याने ३९व्या वाढदिवसाच्या दिवशी बांगलादेश संघाविरुद्ध १३० धावांची खेळी कराची शहरात केली होती. तर अगदी अलिकडे राॅस टेलर हा जगातील ४था खेळाडू ठरला ज्याने वाढदिवसाच्या दिवशीच वनडेत शतकी खेळी केली होती. त्याने ८ मार्च २०११ मध्ये विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध १२४ चेंडूत नाबाद १३१ धावा केल्या होत्या. तेव्हा टेलरचे वय २७ वर्ष होते.

तसेच नुकतेच टॉम लॅथमने २ एप्रिल २०२२ ला आपल्या ३० व्या वाढदिवशी १४० धावांची शतकी खेळी केली. लॅथमने ही खेळी करताना वाढदिवसाच्या दिवशी सर्वोच्च खेळी करण्याच्या २४ वर्षे जुन्या सचिनच्या विक्रमाला मागे टाकले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

सतत ऑस्ट्रेलियाला नडणारा मास्टर ब्लास्टर…

‘विराटच्या करिअरमध्ये इतकी वाईट वेळ येईल असं वाटलं नव्हतं’, कोहलीच्या खराब कामगिरीवर माजी दिग्गजाचे मोठे विधान

हार्दिक पंड्याची गाडी काही थांबेना! हंगामातील सलग तिसऱ्या अर्धशतकामुळे ‘या’ यादीत ठरला ‘टॉपर’


ADVERTISEMENT
Next Post
Photo Courtesy: Twitter/ICC

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचे ५ सिग्नेचर शाॅट्स

Photo Courtesy: Twitter/BCCI

मराठीत माहिती- क्रिकेटर एमएसके प्रसाद

Photo Courtesy: Twitter/ICC

सतत ऑस्ट्रेलियाला नडणारा मास्टर ब्लास्टर...

Please login to join discussion
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.