क्राईस्टचर्च। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना उद्यापासून(29 फेब्रुवारी) हेगली ओव्हल स्टेडियमवर सुरु होणार आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालला खास पराक्रम करण्याची संधी आहे.
मयंकने जर या सामन्यात 36 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो कसोटीमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येईल. सध्या मयंकच्या 10 कसोटी सामन्यातील 15 डावात 64.27 च्या सरासरीने 964 धावा आहेत.
तसेच सध्या कसोटीत सर्वात जलद 1000 धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर विनोद कांबळी असून त्याने 14 डावात 1000 कसोटी धावांचा टप्पा पार केला होता. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे चेतेश्वर पुजारा आणि सुनील गावस्कर आहेत. पुजाराने 18 डावात तर गावस्करांनी 21 व्या डावात 1000 कसोटी डावांचा टप्पा पार केला होता.
त्यामुळे जर मयंकने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 36 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो या यादीत पुजाराला मागे टाकेल.
फक्त आता मयंक कसोटी कारकिर्दीतील 16 व्या डावात की 17 व्या डावात 1000 कसोटी डावांचा टप्पा गाठणार हे पहावे लागेल. कारण त्याने जर न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 36 धावा केल्या तर तो 16 व्या डावात 1000 कसोटी धावा पूर्ण करेल. पण जर त्याने या 36 धावा दुसऱ्या डावात मिळून पूर्ण केल्या तर त्याच्या 1000 कसोटी धावा 17 डावात पूर्ण होतील.
कसोटीमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू (28 फेब्रुवारी 2020 पर्यंत) –
14 डाव – विनोद कांबळी
18 डाव – चेतेश्वर पुजारा
21 डाव – सुनील गावस्कर
23 डाव – संजय मांजरेकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली
शास्त्रींचा टीम इंडियाला खास सल्ला, 'जर पराभवाची चव चाखली नाही तर…'https://t.co/mm3vvAXZ7y#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ
— Maha Sports (@Maha_Sports) February 28, 2020
न्यूझीलंडच्या या गोलंदाजाची टीम इंडियावर स्तुतीसुमने, म्हणाला…https://t.co/A0044Lf5Bc#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ
— Maha Sports (@Maha_Sports) February 28, 2020