पुणे । जागतिक मिनी फुटबॉल फेडरेशनच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारताच्या विठ्ठल शिरगावकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. युक्रेन येथे झालेल्या फेडरेशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवडणुक पार पडली.
यामध्ये तब्बल ३० देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. जागतिक मिनी फुटबॉल फेडरेशनच्या निवडणुकीत कार्यकारिणीवर निवडून जाणारे ते एकमेव भारतीय सदस्य आहेत आणि भारतासह आशियाई देशाचे ते प्रतिनिधीत्व करणार आहेत.
झेक रिपब्लिकचे फिलीप जुडा यांची फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पुढील ४ वर्षांसाठी ही कार्यकारिणी कार्यरत असणार आहे. प्रत्येक खंडामधून एका सदस्याने कार्यकारिणीसाठी निवडणूक लढविली.
आशिया खंडातून भारत आणि लेबनॉन या देशातून प्रत्येकी एक जण सहभागी झाले होते. लेबनॉनच्या सदस्याला १८/५ अशा मतांनी हरवत विठ्ठल शिरगावकर यांनी ही निवडणूक जिंकली.
विठ्ठल शिरगावकर हे भारतीय मिनी फुटबॉल असोसिएशनच्या सचिवपदी असून मिनी फुटबॉल या खेळात भारताने जागतिक स्तरावर प्रतिनिधीत्व करीत चांगली कामगिरी करावी, यासाठी ते प्रयत्नशील असतात.
२०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या ३२ देशांच्या वर्ल्ड कप मध्ये भारताचा सहभाग निश्चित करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. उपाध्यपदी निवड झाल्यानंतर क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांचे अभिनंदन केले.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–दिग्गज भारतीय गोलंदाज झुलन गोस्वामीची टी२० क्रिकेटमधून निवृत्ती
–विराट कोहलीचा कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा डंका
–इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका: पृथ्वी शॉ, हनुमा विहारीचा प्रथमच टीम इंडियामध्ये समावेश