गुरुवारपासून (१७ डिसेंबर) ऍडलेड येथे भारत-ऑस्ट्रेलिया संघामध्ये पहिल्या कसोटी सामन्याची सुरुवात झाली. गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात खेळण्यात आलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. भारताचा कर्णधार विराट कोहली याने युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि मयंक अगरवाल यांना सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर पाठवले. पण भारतीय संघाला पहिल्या षटकातच मोठा धक्का बसला.
स्टार्कने उडवली शॉची दांडी
झाले असे की, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला सामन्यातील पहिले षटक टाकण्यासाठी पाठवले. स्टार्कने त्याच्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या शॉची दांडी उडवली. स्टार्कने तो चेंडू मिडल स्टंप ऑफ इनसाइड एजच्या बाजूने टाकला. शॉने त्या चेंडूला बॅटने हलकासा स्पर्श केला. पण चेंडू जाऊन सरळ यष्टीला लागला. त्यामुळे शॉ खाते न उघडता पव्हेलियनला परतला.
With the second ball of the Test! #OhWhatAFeeling@Toyota_Aus | #AUSvIND pic.twitter.com/4VA6RqpZWt
— cricket.com.au (@cricketcomau) December 17, 2020
https://twitter.com/daksha_mg/status/1339422681188376577
शॉनंतर मयंक आणि चेतेश्वर पुजारा मिळून भारतीय संघाचा डाव पुढे नेत होते. मयंकने १८व्या षटकापर्यंत २ चौकारांच्या मदतीने १७ धावा केल्या होत्या. परंतु १९.१ षटकात पॅट कमिन्सने त्याला त्रिफळाचीत केले. त्यामुळे आता चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली फलंदाजी करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
स्मिथचा प्रश्न ऐकून विराट भावूक, आली वडिलांची आठवण; पाहा Video
ऑस्ट्रेलियाने सोडला सुटकेचा निश्वास! ‘हा’ प्रमुख फलंदाज दिसला सराव करताना
अरेच्चा! सरावात भारतीय खेळाडूंनी लढली चक्क ‘कुस्ती’, पाहा Video