मुंबई । भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गुरुवारी 3 सप्टेंबर रोजी 30 वा वाढदिवस साजरा केला. भारताच्या सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला शमी, सध्या आयपीएल खेळण्यासाठी आपला संघ किंग्ज इलेव्हन पंजाबसोबत युएईमध्ये आहे. बायो सेक्युर बबलमध्ये असल्याने, खेळाडू इतर संघातील खेळाडूंना भेटण्यास असमर्थ आहेत. अशा परिस्थितीत भारतीय कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावर शमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि महत्त्वपूर्ण सल्लाही दिला.
कोहलीने ट्विटरवर लिहिले की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा मोहम्मद शमी. मेहनत आणि गोलंदाजी भरपूर करत रहा.’ यावेळी हा वेगवान गोलंदाज किंग्ज इलेव्हन पंजाबकडून आयपीएलमध्ये खेळत आहे. या लीगमध्ये शमीने आतापर्यंत 51 टी -20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये केवळ 40 विकेट्स त्याच्या नावावर आहेत.
Happy b'day Shami @MdShami11. Mehnat aur bowling dono karte raho daba ke 🤝😃
— Virat Kohli (@imVkohli) September 3, 2020
जानेवारी 2013 मध्ये पाकिस्तानचा संघ भारत दौर्यावर आला होता. एमएस धोनीच्या नेतृत्वात शमीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याला सामन्यात एकच विकेट मिळविता आली, पण त्याने नऊपैकी चार षटके निर्धाव टाकत सर्वांना प्रभावित केले होते. 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषकात महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. या स्पर्धेत त्याने 7 सामने खेळले आणि 17 गडी बाद केले. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज होता.
मोहम्मद शमीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 49 कसोटी सामन्यात 180 तर 77 वनडे सामन्यात 144 बळी घेतले आहेत. याशिवाय आयपीएलमध्ये मोहम्मद शमी 49 सामने खेळला असून त्याच्या नावावर 40 बळी आहेत. कारकीर्दीत दोन विश्वचषक खेळण्याचा अनुभव त्याला आहे. तसेच शमीनेही इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या 2019 च्या विश्वचषकामध्ये, अफगाणिस्तानविरुध्द हॅट्रिक घेत इतिहास घडविला होता. तो विश्वचषकात हॅट्रिक घेणारा चेतन शर्मानंतरचा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या जोफ्रा आर्चरने आपल्या मैत्रिणीसाठी तोडला होता ‘हा’ मोठा नियम
हवेत सूर मारून ४८ वर्षीय प्रवीण तांबेने घेतला अविश्वसनीय झेल; पहा व्हिडिओ
दोन महिन्यांनी दौऱ्यावरुन परत आलेल्या क्रिकेटर बापाला ओळखेना चिमुकला
ट्रेंडिंग लेख –
भारताचे २ दिग्गज फलंदाज, ज्यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ठोकले वेगवान शतक
आयपीएलचे सितारे: कृणाल पंड्या, रवींद्र जडेजा यांना टक्कर देणारा २० वर्षीय अभिषेक शर्मा
वाढदिवस विशेष : क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये ‘फिनिशर’ शब्दाची परिभाषा बदलणारा लान्स क्लुसनर