भारतीय संघाला 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा धक्का बसला आहे. त्यानंतर रविवारी (दि. 9 ऑक्टोबर) रांची येथे उभय संघात दुसरा वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने भारताला चांगली सुरुवात करून दिली. त्याने दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक याला तंबूचा रस्ता दाखवला. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा प्रभारी कर्णधार केशव महाराज याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजाने त्याचा हा निर्णय प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने या सामन्यातील पहिल्या षटकात 5 धावा दिल्या. त्यानंतर आपले दुसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या सिराजने पहिल्याच चेंडूवर क्विंटन डी कॉक याला बाद केले आणि पव्हेलियनमध्ये धाडले. पहिल्या सामन्यात अफलातून फलंदाजी करत 48 धावा करणाऱ्या डी कॉकला सिराजने 5 धावांवर तंबूत जाण्यास भाग पाडले.
सिराजच्या फुल लेंथ चेंडूवर कव्हर ड्राईव्ह मारण्याच्या नादात डी कॉकने बॅट उगारली. मात्र, त्याच्या बॅटची कड घेत चेंडू थेट स्टंपवर जाऊन लागला. त्यामुळे डी कॉकचा डाव इथेच संपला. त्याने 8 चेंडूत 5 धावा केल्या. यामध्ये एका चौकाराचाही समावेश होता.
Siraj gets de Kock early in Ranchi.
🇿🇦: 7/1 (2.1 overs)#INDvsSA #SAvsIND pic.twitter.com/2WTvxeBwYT
— Faiz Fazel (@theFaizFazel) October 9, 2022
Flight of joy! 👏 👏
Early success for #TeamIndia, courtesy @mdsirajofficial! 👌 👌
South Africa lose Quinton de Kock.
Follow the match ▶️ https://t.co/6pFItKAJW7 #INDvSA pic.twitter.com/khqVZO1qZP
— BCCI (@BCCI) October 9, 2022
टी20 मालिका केली नावावर
भारतीय संघाने या वनडे मालिकेपूर्वी खेळलेली टी20 मालिका आपल्या नावावर केली होती. भारताने दक्षिण आफ्रिका संघाला 2-1ने पराभूत करत मालिका खिशात घातली होती. आता या वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिका 1-0ने आघाडीवर आहे. दुसरा सामना जिंकून भारताला मालिकेत पुनरागमन करावे लागेल. जर असे झाले नाही, तर भारताला ही मालिका गमवावी लागेल.
उभय संघाची प्लेईंग इलेव्हन
भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान.
दक्षिण आफ्रिका संघ- जानेमन मलान, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीजा हेंड्रिक्स, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, वेन पार्नेल, केशव महाराज (कर्णधार), ब्योर्न फोर्टुइन, कागिसो रबाडा, एन्रीच नॉर्किया.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 क्रिकेटमधील ‘न भूतो’ कामगिरी शाकिबच्या नावे; इतिहासात आजवर कोणीच पोहोचले नाही जवळपास
भारतीय संघाला मिळाला नवा अष्टपैलू, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत केले आंतरराष्ट्रीय पदार्पण