भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताची अवस्था दयनीय झाली होती. परंतु मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी अभेद्य भागीदारी करत इंग्लडवरील दबाव वाढवला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यापुढे इंग्लंड संघाने गुडघे टेकले आणि भारतीय संघाने 151 धावांनी विजय मिळवला. याच पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या चित्तथरारक विजयानंतर भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला मोहम्मद सिराज मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करताना दिसला. त्याचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओत तो संघ सहकारी मयंक अगरवालसोबत नाचतो आहे.
Siraj 🥳 pic.twitter.com/UPJjsonpXe
— Phoebe (@Enchante__18) August 17, 2021
https://twitter.com/NiviDhoni_7/status/1427535312306073601?s=20
लॉर्ड्सच्या विजयानंतर सिराजने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे आणि या विजयाचे ‘संस्मरणीय’ असे वर्णन केले आहे. सिराजने लिहिले आहे की, ‘जादू ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवायला शिकवते. जर तुम्ही ते करू शकलात तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. किती अद्भुत सांघिक विजय.’
https://www.instagram.com/p/CSplEKKBqMK/?utm_source=ig_web_button_share_sheet
या रोमांचक सामन्यात केएल राहुलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला असला तरीही भारतीय गोलंदाजांनी लॉर्ड्स कसोटीत खरी मजा आणली होती. सर्वात खास म्हणजे, शमीने भारताच्या दुसऱ्या डावात अर्धशतक केले. तर दुसरीकडे भारतीय गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीने अक्षरशः कहर केला आणि इंग्लिश फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ आता 1-0 ने पुढे आहे. पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता.
सिराजने लॉर्ड्सवर आठ बळी मिळवले. असे करून त्याने कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. कपिल देव यांनी लॉर्ड्सवर कसोटी सामना खेळताना एकाच सामन्यात 8 विकेट्स देखील घेतल्या होत्या. 1982 मध्ये लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या कसोटीत कपिल देवने 168 धावा देऊन 8 बळी घेतले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
काही लोक तुम्हाला ते भारतीय क्रिकेटपटू असल्याचे सांगतील, त्यांना विना ओळखपत्र आत सोडू नका
पवार साहेबांचे सासरे, ज्यांनी क्रिकेटमध्ये धावांना दाखवला सरासरीचा घाट