जगातील दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनी या दोन भारतीय खेळाडूंची गणना होते. या दोघांना एकत्र पाहणे, ही चाहत्यांसाठी जणू पर्वणीच असते. आता या दोन दिग्गजांना एकत्र पाहण्याचा सुवर्णयोग चाहत्यांना लाभला आहे. सचिन आणि धोनी पुन्हा एकदा एकत्र झळकले आहेत. त्यांचे यादरम्यानचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.
खरं तर, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि एमएस धोनी (MS Dhoni) हे दोघेही टेनिस खेळताना दिसले आहेत. धोनी आणि सचिन एकाच कोर्टवर कॅज्युअल टी-शर्ट आणि ट्रॅक पँटमध्ये टेनिस खेळताना दिसले. दोघांनाही एकत्र खेळताना पाहून चाहतेही भलतेच खुश झाले आहेत. या दिग्गज खेळाडूंचे फोटो आता चाहतेही जोरदार व्हायरल करत आहेत.
हे दोघेही टेनिस कोर्टवर एकत्र दिसण्यामागे एक कारण आहे. ते म्हणजे, जाहिरात. सचिन आणि धोनी यांचे व्हायरल होत असलेले फोटो एका जाहिरातीदरम्यानचे आहेत. शूटिंगसाठी दोन्ही खेळाडू टेनिस कोर्टवर पोहोचले आणि त्यांनी टेनिस खेळण्याचा आनंद लुटला. व्हायरल होत असलेल्या फोटोत दिसते की, धोनी आणि सचिन दोघेही क्रू मेंबर्स काय सांगतायेत ते ऐकत आहेत आणि ते सांगतील तसे करत आहेत. पहिल्या फोटोत सचिन आणि धोनी जाहिरातीच्या क्रू मेंबर्ससोबत चर्चा करताना दिसत. तसेच, दुसऱ्या फोटोत दोघेही नेटजवळ उभे राहून एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहेत.
Latest pictures of MS Dhoni with Sachin tendulkar pic.twitter.com/H8l3lAfHci
— Jayprakash MSDian™ 🥳🦁 (@ms_dhoni_077) October 6, 2022
क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या या दिग्गज खेळाडूंना एकत्र पाहून चाहते भलतेच खुश झाले आहेत. चाहते त्यांना एकत्र पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कुणी म्हणतंय की, या दोन्ही खेळाडूंना क्रिकेटच्या मैदानावर पाहायचंय. तसेच, काही चाहते या दोघांना शतकातील महान क्रिकेटर्स म्हणत आहेत.
सचिन आणि धोनी या दोघांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, निवृत्तीनंतरही या दोघांची लोकप्रियता कायम आहे. या दोन्ही खेळाडूंना टेनिस खूप आवडते. सचिनही नेहमीच टेनिस सामने पाहताना दिसतो. रॉजर फेडरर हा सचिनचा मित्र असल्याचे म्हटले जाते. तो नुकताच, फेडररचा सामना पाहण्यासाठी लंडनलाही गेला होता.
दुसरीकडे, धोनीबद्दल बोलायचं झालं, तर तोदेखील यूएस ओपन पाहण्यासाठी गेला होता. तिथे त्याच्यासोबत कपिल देव हेदेखील उपस्थित होते. धोनीला टेनिस आणि फुटबॉलव्यतिरिक्त गोल्फ या खेळाचीही आवड आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद करायचा नाय! पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला बांगलादेशकडून घेतला, टीम इंडिया पुन्हा टेबल टॉपर
ब्रेकिंग! टीम इंडियाच्या ‘या’ वेगवान गोलंदासाठी मिळाला पर्याय, संघात लवकरच होणार सामील