येत्या एप्रिल महिन्यापासून भारतात टी२० क्रिकेटच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. ९ एप्रिल पासून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. गतवर्षी कोरोना असल्या कारणामुळे आयपीएल स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात आली होती. परंतु यंदा ही स्पर्धा भारतातच होणार आहे. अशातच चेन्नई सुपर किंग्स संघाने देखील सरावाला सुरुवात केली आहे. कॅप्टन कूल एमएस धोनी सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे. त्याच्या फलंदाजीच्या सरावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आयपीएलच्या इतिहासात दुसरा सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळख निर्माण केलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाला आयपीएल २०२० हंगामामध्ये झालेल्या आयपीएल हंगामात साजेशी कामगिरी करता आली नव्हती. चेन्नईला ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. अशातच चेन्नईने आगामी हंगामासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
चेन्नई सुपर किंग्स संघाच्या अधिकृत ट्विटर हँडेलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये धोनी नेट्समध्ये फलंदाजी करताना दिसून येत आहे. यात तो चेंडू स्टँडमध्ये लांबच लांब मारताना दिसून येत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत त्यांनी लिहिले आहे की, “धोनी १०९ आणि ११४ मीटरचे लांब लांब षटकार मारत आहे.” या व्हिडिओला सोशल मीडियावर प्रचंड शेअर केले जात आहे.
Let the whistles travel for 109, 114,……… metres! #WhistlePodu #Yellove 💛🦁 @msdhoni pic.twitter.com/J7nExa0vVT
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 20, 2021
चेन्नई संघ या हंगामात जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्यांचा १४ व्या हंगामातील पहिला सामना १० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स संघासोबत रंगणार आहे. या सामन्यात विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडवर सर्वांचे लक्ष असणार आहे. तसेच यंदा संघात चेतेश्वर पुजारा, मोईन अली आणि रॉबिन उथप्पा यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे चेन्नई संघाच्या चाहत्यांना या खेळाडूंकडून चांगल्या खेळाची अपेक्षा असणार आहे.
आयपीएल २०२१ साठी चेन्नई सुपर किंग्स संघ
एमएस धोनी (कर्णधार) , फाफ डु प्लेसीस, ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना, अंबाती रायुडू, एन जगदीशन, रॉबिन उथप्पा, रविंद्र जडेजा, सॅम करन, ड्वेन ब्रावो, कर्ण शर्मा, आर साई किशोर, मिचेल सँटनर, इम्रान ताहिर, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, लुंगी एन्गिडी, जोश हेजलवुड, केएम आसिफ, मोईन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भागात वर्मा, हरी निशांत, रॉबिन उथप्पा.
महत्त्वाच्या बातम्या –
भविष्यात टीम इंडियासाठी रोहितसह सलामीला उतरणार का? विराटने दिले ‘हे’ उत्तर
बेन स्टोक्सला ‘या’ क्रमांकावर खेळवणे निरउपयोगी, इंग्लंडच्या दिग्गजाने सुनावले
मिताली राजची भूमीका साकारत असलेल्या तापसी पन्नूचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘सेम टू सेम’