भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने क्रिकेटमधून दोन महिन्यासाठी ब्रेक घेतला आहे. भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. पण धोनीने तो या दौऱ्यासाठी उपलब्ध नसल्याचे आधीच बीसीसीआयला कळवले होते. तो हा दोन महिन्याचा वेळ भारतीय सैनेबरोबर घालवणार आहे.
धोनी हा भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल आहे. धोनी पुढिल दोन महिन्यात कश्मीर व्हॅलीमध्ये पॅराशुट रेजिमेंटबरोबर कोणती जबाबदारी पार पाडणार आहे याबद्दल भारतीय सेनेने माहिती दिली आहे.
भारतीय सेनेने माहिती दिली आहे की ‘लेफ्टनंट कर्नल(मानद) एमएस धोनी 31 जूलै ते 15 ऑगस्ट दरम्यान 106 टीए बटालियन(पॅरा) बरोबर असेल. तो पेट्रोलिंग, गार्ड आणि पोस्ट ड्यूटूी या जबाबदाऱ्या निभावेल आणि तो सैन्याबरोबरच राहिल. यासाठी सेना मुख्यालयाने(आर्मी हेडक्वार्टर्स) मंजूरी दिली आहे.’
धोनीला 2011च्या विश्वचषकानंतर भारताच्या प्रादेशिक सेनेत लेफ्टनंट कर्नल ही सन्माननीय पदवी देण्यात आली होती. तसेच 2015मध्ये धोनीने आग्रा ट्रेनिंग कॅम्पमध्ये 5 पॅराशुट ट्रेनिंग जम्प्स पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे तो पात्र पॅराट्रुपर आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–प्रो कबड्डीच्या या सामन्यासाठी उपस्थित राहणार टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली
–टीम इंडियाच्या जर्सीवर ओप्पो ऐवजी आता दिसणार हे नाव
–प्रो कबड्डीत हा मोठा पल्ला पार करणारा तेलुगू टायटन्स केवळ दुसराच संघ