बुधवार दि.२७ जूनपासून सुरू होत असलेल्या भारत-आयर्लंड टी-२० मालिकेच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परीषदेत आयर्लंड संघाचा कर्णधार गॅरी विल्सनने पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी मोठे वक्तव्य केले आहे.
या पत्रकार परीषदेत गॅरी विल्सनने भारतीय संघाला सावधगिरीचा इशारा देत भारतीय कर्णधार विराट कोहली आणि सलामीचा फलंदाज रोहित शर्माविषयी मोठे भाष्य केले आहे.
“भारत हा टी-२० क्रिकेटमधला मोठा संघ आहे. असे असले तरी आम्हाला गोलंदाजी करायची आहे आणि त्यांना फलंदाजी. मग त्याच्यांकडे विराट कोहली असो, रोहित शर्मा असो नाहीतर आणखी कोणी.” असे पत्रकारांशी बोलताना आयरीश कर्णधार म्हणाला.
“मी आमच्या संघातील खेळाडूंना निडर होऊन भारताशी सामना करत क्रिकेटचा आनंद लुटा म्हणुन सांगितले आहे. भारतीय संघ टी-२० क्रिकेटमधील उत्कृष्ठ संघ असला तरी आमच्यातही गट्स आहेत हे आम्ही उद्या भारतीय संघाला दाखवून देऊ.” आयर्लंडच्या कर्णधार गॅरी विल्सन पुढे बोलताना म्हणाला.
भारतीय संघ सध्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असला तरी कोहलीच्या टीम इंडियाने आयर्लंड संघाला कमी लेखून चालणार नाही.
यापूर्वी आयर्लंडने जगातील अव्वल संघाना मोठे झटके दिले आहेत. यामध्ये २००७ च्या विश्वचषकात पाकिस्तान तर २०१५ च्या विश्वचषकात बलाढ्य इंग्लंडला पाणी पाजले आहे.
दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना बुधवार दि.२७ जूनला डब्लिन येथे रात्री ८:३० वाजता सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-Video: हार्दिक पंड्याने घेतली आजी-माजी कर्णधारांची हटके…
-जगात अनेक क्रिकेटर झाले परंतु असा पराक्रम करणारा धोनी एकटाच!