ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार ऍरॉन फिंचने (Aaron finch) म्हटले आहे की, त्याला आयपीएल खेळायची आहे. परंतु त्याला मेगा लिलावात कोणत्याच फ्रॅंचायझीने निवडले नाही. विक्री न झाल्याबद्दल आश्चर्य वाटत नसल्याचेही त्याने सांगितले आहे. ८५ आयपीएल सामन्यांमध्ये ८ फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व करताना फिंचने २५.७१ च्या सरासरीने २००५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये १४अर्धशतकांचा समावेश आहे. फिंच शेवटचा आयपीएल सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कडून २०२० च्या स्पर्धेत खेळला होता. तो हंगाम संपल्यानंतर फ्रँचायझीने त्याला सोडले होते.
आयपीएल २०२१ पूर्वी लिलावात तो विकला गेला नाही. गेल्या वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने २०२१ मध्ये आयसीसी टी२० विश्वचषक जिंकला होता. आयपीएलमध्ये कोणत्याच फ्रॅंचाईजीने खरेदी न केल्यानंतर एका शोमध्ये फिंच म्हणाला, “मला खेळायला आवडते यात काही शंका नाही. परंतु, भारतीय फ्रँचायझींनी असेच खेळाडू निवडले आहेत, जे खरोखरच चांगली कामगिरी करू शकतात. सर्व संघांना प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाच, सहा आणि सात क्रमांकावरील फलंदाज हवे आहेत. त्यामुळे मला बोली न लागल्याने आश्चर्य वाटले नाही. मला तिथे राहायला आवडले असते. पण, त्यांनी मला १० वर्षे संधी दिली आहे ज्यासाठी मी आभारी आहे.”
या आयपीएल लिलावात भारताचा माजी खेळाडू सुरेश रैना तसेच स्टीव्ह स्मिथ मोठ्या खेळाडूंवर कोणत्याच फ्रॅंचायझीनी बोली लावल्या नाहीत. तर, ईशान किशनला मुंबई इंडीयन्सने सर्वाधिक बोली लावत १५.२५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. या लिलावात २०४ खेळाडूंवर १० फ्रॅंचायझींनी बोली लावली. आयपीएचा आगामी हंगाम मार्च महिन्याच्या अखेरीस सुरु होईल.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ खेळाडूला विकी ओस्तवाल मानतो आदर्श; आयपीएल लिलावानंतर केले अनेक गोष्टींचे खुलासे (mahasports.in)