2028 साली अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा प्रवेश झाला आहे. मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आला असून, त्यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. चाहत्यांसोबतच अनेक माजी खेळाडूही या निर्णयावर खूश आहेत. दरम्यान, महिला आणि पुरुष क्रिकेट स्पर्धांमध्ये कोणते खेळाडू आणि संघ वर्चस्व गाजवतील, याचा अंदाज काही माजी खेळाडूंनी वर्तवला आहे.
आयसीसीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज (Mithali Raj) प्रथम म्हणाली, “2028 अजून दूर आहे. माझ्या मते, सध्याच्या संघातून शफाली वर्मा (Shafali Verma) आणि ऋचा घोष (Richa Ghosh) ऑलिम्पिकमध्ये खेळतील आणि या दोघीही संघाला विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.”
वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज इयान बिशप (Ian Bishop) म्हणाला, “वेस्ट इंडिजने ऑलिम्पिकमध्ये पोहोचावे आणि सुवर्णपदक जिंकावे अशी माझी इच्छा आहे. महिलांमध्ये, मला वाटते की कारकिर्दीच्या शिखरावर असलेली हेली मॅथ्यूज ऑलिम्पिकचा भाग घेईल. यानंतर या भारतीय संघात युवा प्रतिभेची कमतरता नाही. यापैकी माझा आवडता शुभमन गिल आहे जो यावेळी त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर आहे.”
ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू लिसा स्थळेकर (Lisa Sthalekar) म्हणाली, “मला वाटते की भारतीय संघ ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकेल. मी तुम्हाला यामागचे कारण सांगते, कारण अलीकडच्या काळात त्यांची कामगिरी खूप चांगली झाली आहे. ते कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळले होते आणि ते सध्या चांगली कामगिरी करत आहेत. 2028 हे वर्ष त्यांच्यासाठी स्वत:ला सिद्ध करण्याची योग्य संधी असेल. माझ्या मते शफाली वर्मा आणि ऋचा घोष या स्पर्धेत आपली जादू दाखवण्यात यशस्वी होतील.”
या अगोदर 1900 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समवेश होता. त्यावेळी ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स या दोन संघांमध्ये क्रिकेट सामना खेळला गेला, ज्यामध्ये ग्रेट ब्रिटनने विजय मिळवून सुवर्णपदक जिंकले होते. (Olympics 2028 will be dominated by This athletes amazing names taken by legendary athletes)
महत्वाच्या बातम्या –
IND vs BAN: बांगलादेशने जिंकला टॉस, टीम इंडिया विजयी ‘चौकार’ मारण्यासाठी सज्ज; पाहा Playing XI
पंड्याकडून भारताच्या 2023 विश्वचषकातील यशाचा खुलासा; म्हणाला, ‘आम्ही ड्रेसिंग रूममध्ये सर्वांचे…’