इंग्लंडमध्ये १८ व्या शतकापासून क्रिकेट खेळले जात होते पण आंतरराष्ट्रीय स्थरावर त्याला मान्यता ही १९व्या शतकात मिळत गेली. क्रिकेटला खूप मोठा इतिहास आहे. १९ व्या शतकात क्रिकेटला पूरक नाव मिळाले होते ते म्हणजे वेस्ट इंडीज. सर विवियन रिचर्ड्स, सर गॅरी सोबर्स, बोर्डेन ग्रिनिच, मायकेल मार्शल हे ते धुरंधर होते ज्याच्यामुळे क्रिकेटला अफाट लोकप्रियता लाभली. त्यांच्यापैकी एक पण त्यांचा पुढील पिढीतील होते महान खेळाडू ब्रायन चार्ल्स लारा. याच लाराच्या कारकिर्दीतील एका शानदार खेळीला आज (१२ एप्रिल) १८ वर्षे पूर्ण झाली आहेत.
ब्रायन लाराने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात ६ डिसेंबर १९९० रोजी केली. त्या वेळेस कोणी विचारही केला नसेल की हा खेळाडू पुढे जाऊन एवढा मोठा महान खेळाडू होईल आणि जागतिक क्रिकेटमधील कितीतरी विक्रम आपल्या नावे करेल. १२ एप्रिल रोजी लाराने असाच एक मोठा विक्रम आपल्या नावे केला होता.
Today in 2004, 13 years ago: Test cricket's only quadruple century was achieved by a certain Brian Lara – 400* in 582 balls! pic.twitter.com/pgq7E5tvQV
— Mohandas Menon (@mohanstatsman) April 12, 2017
वेस्ट इंडीज संघाची १९९४ ची परिस्तिथी खूप चांगली होती, यात साहेबांनी वेस्ट इंडीजचा दौरा ठरवला. या दौऱ्यातील ५ व्या कसोटीमध्ये पहिल्या डावात खेळताना ब्रायन लाराने ३७५ धावांची रेकॉर्ड ब्रेक खेळी केली. त्याने सर गॅरी सोबर्स यांचाच ३६ वर्षांपूर्वीचा ३६५ धावांचा विक्रम मोडीत काढला. हा टेस्ट सामना अनिर्णित राहिला.
वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचा विक्रम ऑस्ट्रेलिया कसा त्यांचा नावावर राहू देणार होता, पण हा विक्रम मोडणे म्हणजे सुईत दोरा ओवण्या इतका सोपा नव्हता. तो एक धावांचा डोंगर होता जो मोडणे जवळ जवळ अशक्य होते. पण तोपर्यंत क्रिकेटविश्वात ऑस्ट्रेलियन मेथ्यु हेडन नावाच वादळ आले होते. त्याने ९ ऑक्टोबर २००३ ला झिम्बॉबवे विरुद्ध खेळताना ३८० धावा बनवून मोडून काढला.
लारा शांत बसणाऱ्या मधला नव्हता त्याला तोच विक्रम परत त्याचा नावावर हवा होता. २००४ साली परत साहेबांनी वेस्ट इंडिज दौरा करण्याचे ठरवले. यात ४ कसोटी सामने होते. पण यावेळचा वेस्ट इंडिजचा संघ इतका मातब्बर नव्हता. पाहिल्या ३ कसोटीमध्ये वेस्ट इंडिज संघ हारला. ज्यात कर्णधार असूनही लाराने फक्त १०० धावा काढल्या होत्या. त्याला स्वतःलाही सिद्ध करायचे होते. सामना होता अँटिगुआच्या त्याच सेंट जॉन्स मैदानावर जिथे त्याने एप्रिल १९९४ मध्ये साहेंबांविरुद्ध ३७५ धावांची खेळी केली होती. वेळ पुन्हा तिथेच आली. एप्रिलचाच महिना आणि फूल बनण्यासाठी पुन्हा साहेबच.
तीन कसोटीतील अपयश धुवून काढत त्याने प्रथमतः कसोटी मालिकेत शतक पूर्ण केले. मधल्या फळीतील फलंदाजांना घेऊन बघता बघता द्विशतक पूर्ण केले. सामन्याचा तिसऱ्या दिवशी त्रिशतक पूर्ण केले. प्रेक्षकांना उत्सुकता होती कि तोच आता किती धावा बनविणार कारण पाहिले त्रिशतक केले तेव्हा त्याने सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला होता. आता पण तो त्याची पुनरावृत्ती करणार का हा विचार प्रेक्षक आणि क्रिकेट पंडित करू लागले. आता तोच चेंडूशी खेळत नव्हता तर इंग्लंडच्या गोलंदाजांच्या मानसिकतेशी खेळत होता.
वेगवान गोलंदाजाला ऑफ ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राइव तर सेप्पीनेरला पुढे सरसावत सिक्स मारत होता. बघता बघता त्याने हेडनचा ३८० धावांचा विक्रम मोडीत काढला. ३९९ वर गेल्या नंतर सुंदर पॅडलस्वीपचा फटका मारत एक धाव घेतली आणि कसोटी इतिहासातील वैयक्तिक ४०० धावांचा नवा विक्रम प्रस्थापित केला. या खेळीत त्याने ४३ चौकार तर ४ षटकार मारले.
ती होती चौथी कसोटी, चौथा महिना, साल २००४ आणि धावा नाबाद ४००. हा विक्रम करत असताना बाकी अनेक विक्रमांशी तो जोडला गेला. सर्वाधिक मिनिटे खेळपट्टीवर राहण्याच्या विक्रमामध्ये तोच ७ व्या स्थानावर राहीला, सर्वाधिक बॉल खेळण्याच्या यादीत तो ११ व्या स्थानावर राहीला. असे अनेक विक्रम त्याच्या नावावर त्या दिवशी जोडले गेले.
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १७: धोनी आधी पदार्पण करुनही १४ वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १६: राजेशाही घराण्यातूनच क्रिकेटचा वारसा घेऊन आलेला अजय जडेजा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज अनिल कुंबळे
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण