fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानचं स्पेलिंगच लिहीलं चुकिच, मग काय सोशल मीडियावर…

मुंबई । पाकिस्तानचा क्रिकेट संघ तीन कसोटी आणि टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी रविवारी इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाला आहे. याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने फोटोसह ट्विटरवर दिली आहे. ही माहिती देत असताना चक्क पाकिस्तानच्या नावाची स्पेलिंग चुकीचे लिहिण्यात आले. Pakistan असे लिहीण्याऐवजी Pakiastan असे लिहीले होते. त्यानंतर सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर संघातील 20 खेळाडू आणि 11 सपोर्ट स्टाफ इंग्लंडकडे रवाना झाल्याची माहिती दिली. ही माहिती देताना पाकिस्तानचे स्पेलिंग चुकीचे लिहिण्यात आले. त्यानंतर सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले.

काही वेळानंतर हे ट्विट काढून टाकण्यात आले. पाकिस्तान बोर्डाच्या या एका चुकीवर सोशल मीडियावर हास्यास्पद विनोदांचा पाऊस पडला. जैव सुरक्षित वातावरणात कसोटी आणि टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

You might also like