नवी दिल्ली| पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी कर्णधार मिसबाह उल हक यांनी एक विधान केले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की जर जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात (बायो बबल) क्रिकेट खेळणे सुरू राहिले तर पाश्चात्य देशातील खेळाडूंना मानसिक आरोग्याचा त्रास होण्याची अधिक शक्यता आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तान संघ जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात खेळला होता.
कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर जवळपास दोन महिने चालणार्या आयपीएलचे आयोजनही जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात केले जात आहे.
मानसिक समस्यांवर मिस्बाहचा युक्तिवाद
मिस्बाह यांनी यूट्यूब वाहिनीवरील क्रिकेटबज या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, “जर सध्या क्रिकेट खेळले जात असेल तर, खेळाडू आणि संघातील अधिकाऱ्यांचे मानसिक आरोग्य ही समस्या आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, आमच्या सामाजिक वातावरणामुळे आमचे खेळाडू मानसिकदृष्ट्या मजबूत आहेत, त्यामुळे ते या टप्प्यावर सामोरे जाऊ शकतात.”
पाकिस्तानची संस्कृती आहे वेगळी
पुढे बोलताना ते म्हणाले की, “माझा असा विश्वास आहे की दीर्घकाळापर्यंत पाश्चात्य देशांमधील खेळाडू आणि अधिकाऱ्यांना अधिक समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यांची संस्कृती आपल्या संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. पाकिस्तानी संस्कृतीत भिन्न प्रकारचे सामाजिक आदान प्रदान आहे. पाश्चात्य देशातील लोकांना बाहेर फिरायची सवय आहे.”
इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तानी खेळाडूंना झाली मदत
“इंग्लंड दौर्यावर काही अटींसह क्वारंटाईनमध्ये राहावे लागले होते. ती परिस्थिती खेळाडूंसाठी अतिशय कठीण होती. त्यामुळे क्रिकेटच्या दृष्टिकोनातून पाकिस्तानी खेळाडू आणि अधिकाऱ्यांना खूपच मदत झाली.” असेही पुढे बोलताना मिस्बाह म्हणाले.
झिम्बाब्वे संघासोबत खेळणार मालिका
इंग्लंडमधील कसोटी आणि टी20 मालिका पाकिस्तान संघाने गमावली होती. आता पाकिस्तानला 30 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेत भाग घ्यायचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“डिविलिअर्सचा गृहपाठ पूर्ण तर, ३ मुलं सापडली अडचणीत”, विराटला आठवले शाळेचे दिवस
CSK चाहत्यांनो नाराज होऊ नका! अजूनही चेन्नई पोहचू शकते प्लेऑफमध्ये, अशी आहेत समीकरणे
भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरु
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज
सीएसकेला दूसऱ्या ड्वेन ब्रावोचा शोध, ‘ही’ ३ नावं आहेत चर्चेत
नजर हटी, दुर्घटना घटी: दांडी उडवून गेलेल्या चेंडूला वाईड देणारे डॅरेल हार्पर