आशिया चषक 2023 स्पर्धेतील पाचवा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान कोलंबो येथे खेळला जात आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी 45 षटकांचा करण्यात आलेला. मात्र पुन्हा एकदा पाऊस आल्याने केवळ 42 षटकांचा हा सामना करण्याचा निर्णय घेतला गेला. पाकिस्तानी या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अब्दुल्ला शफीक व मोहम्मद रिझवान यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 7 बाद 252 धावा केल्या. स्पर्धेच्या अंतिम फेरी प्रवेश करण्यासाठी यजमान श्रीलंका संघाला हे आव्हान आता पार करावे लागेल.
दोन्ही संघांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या सामन्याला पावसामुळे जवळपास दोन तास उशिराने सुरुवात झाली. त्यामुळे हा सामना प्रत्येकी 45 षटकांचा करण्याचा निर्णय घेतला गेला. पाकिस्तानची सामन्यात सुरुवात शानदार झाली नाही. फखर झमान केवळ चार धावा करून बाद झाला. त्यानंतर बाबर आझम व अब्दुला शफिक यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. बाबर बाद झाल्यानंतर शफिक याने शानदार अर्धशतक झळकावले. पाकिस्तान संघ पाच बाद 130 अशा स्थितीत असताना मोहम्मद रिझवान व इफ्तिखार अहमद यांनी 108 धावांची भागीदारी करून डाव सावरला.
रिझवान याने अखेरपर्यंत नाबाद राहत 73 चेंडूंमध्ये 86 धावांची खेळी केली. श्रीलंकेसाठी पथिराना याने सर्वाधिक तीन बळी मिळवले. या सामन्यात विजेता ठरणारा संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल.
(Pakistan Post 252 Runs Against Srilanka In Asia Cup Super 4 Rizwan Hits Fifty)
हेही वाचा-
कॅलिसने निवडले वर्ल्डकपसाठी टॉप फाईव्ह खेळाडू! ‘ते’ एक नाव चकित करणारे
खुशखबर! श्रेयस पुन्हा उतरला मैदानात, बांगलादेशविरुद्ध खेळणार ‘या’ क्रमांकावर?