• About Us
गुरूवार, जून 8, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

लग्नाच्या 4 दिवसांमध्येच वैतागला पाकिस्तानी क्रिकेटर; मॉडेल असणाऱ्या पत्नीबाबत म्हणाला, ‘सावध राहा…’

लग्नाच्या 4 दिवसांमध्येच वैतागला पाकिस्तानी क्रिकेटर; मॉडेल असणाऱ्या पत्नीबाबत म्हणाला, 'सावध राहा...'

Atul Waghmare by Atul Waghmare
डिसेंबर 27, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Haris-Ruaf-And-Muzna-Masood

Photo Courtesy: Twitter/haniaeyz_


शनिवारी (दि. 24 डिसेंबर) पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ बोहल्यावर चढला. त्याने वर्गमैत्रिणीसोबत लग्न केले.  हॅरिस पत्नी मुजना मसूद ही पेशाने मॉडेल आहे. एकत्र शिक्षण घेताना हे दोघेही एकमेकांचे मित्र बनले होते. आता या दोघांनी त्यांच्या नात्याचे रूपांतर पती-पत्नीमध्ये केले आहे. मात्र, लग्नानंतर हॅरिसला सोशल मीडियावर संकटाचा सामना करावा लागत आहे. त्याच्या पत्नीच्या नावाने सोशल मीडियावर अनेक बनावट अकाऊंट सुरू केले गेले आहेत. या अकाऊंटमार्फत लोकांना त्यांचे फॉलोव्हर्स वाढवायचे आहेत. अशात क्रिकेटपटूने स्वत: पुढे येत खरे काय ते सांगितले आहे.

हॅरिस रौफचे ट्वीट
हॅरिस रौफ (Haris Rauf) याने स्वत: त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. त्याने सांगितले आहे की, पत्नी मुजना मसूद (Muzna Masood) हिच्या नावाने बनवले गेलेले सर्व अकाऊंट हे बनावट आहेत.

त्याने ट्वीटमध्ये लिहिले की, “सर्वांना नमस्कार, मला स्पष्ट करायचे आहे की, माझी पत्नी मुजना मसूद मलिक कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाहीये. तिचे कोणतेही अधिकृत अकाऊंट नाहीये. कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहा. तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद.”

Hello everyone, I just want to make it clear that my wife, Muzna Masood Malik, is not on any social media platforms. She does not have an official account. Please be cautious of any scams. Thank you so much for all of your prayers and good wishes.

— Haris Rauf (@HarisRauf14) December 25, 2022

मुजनाने तिच्या लग्नावेळी हातावर हॅरिससाठी खास मेहंदी काढली होती. तिने हातावर हॅरिस 150 असे लिहिले होते. ही मेहंदी हॅरिसच्या गोलंदाजीची गती दाखवते. हॅरिस त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. ऑस्ट्रेलियात कमाल केल्यानंतर त्याने पाकिस्तान संघात एन्ट्री केली. त्याने टी20 आणि वनडेमध्ये पाकिस्तानसाठी धमाल केली आहे. मात्र, कसोटीत त्याला त्याच्या क्षमतेनुसार खास कामगिरी करता आली नाहीये.

mr and mrs haris rauf mashaAllah 🥺 pic.twitter.com/70zNzHkuEk

— hania (@haniaeyz_) December 24, 2022

हॅरिसच्या लग्नात संघसहकारी
हॅरिसच्या लग्नात पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी आणि रौफचा संघसहकारी शाहीन आफ्रिदी यानेही हजेरी लावली होती. रौफ आता पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या टी20 मालिकेत खेळताना दिसू शकतो. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी संघात हॅरिसला संधी मिळाली नाहीये.

हॅरिसची कारकीर्द
हॅरिसच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने पाकिस्तानकडून 1 कसोटी, 15 वनडे आणि 57 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याला फक्त एक विकेट घेण्यात यश आले आहे. तसेच, वनडेत त्याने 5.8च्या इकॉनॉमी रेटने 29 विकेट्स आणि टी20त 8.07च्या इकॉनॉमी रेटने 72 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. (pakistani cricketer haris rauf clears his wife doesn t use social media accounts on her name are fake)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या 35 वर्षीय पठ्ठ्याचे 4 वर्षांनंतर पुनरागमन, मैदानावर उतरताच दाखवला दम; रिझवानची जागा धोक्यात

डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ‘हा’ खेळाडू महत्वाचा, भारतीय दिग्गजाचा दावा


Previous Post

पाकिस्तानच्या 35 वर्षीय पठ्ठ्याचे 4 वर्षांनंतर पुनरागमन, मैदानावर उतरताच दाखवला दम; रिझवानची जागा धोक्यात

Next Post

‘भावा काहीतरी कर, पप्पी- किस घे…’, मोहम्मद कैफचा पुजाराला अजब सल्ला; मॅचविनरही खळखळून हसला

Next Post
Mohammad-Kaif-And-Cheteshwar-Pujara-Video

'भावा काहीतरी कर, पप्पी- किस घे...', मोहम्मद कैफचा पुजाराला अजब सल्ला; मॅचविनरही खळखळून हसला

टाॅप बातम्या

  • शमी जोमात स्मिथ कोमात! घातक चेंडूवर ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे तोंड उघडेच्या उघडे
  • ‘MPLमधील खेळाडू भविष्यात IPL आणि देशाच्या संघात चमकतील…’, लिलावानंतर रोहित पवारांचे लक्षवेधी ट्वीट
  • WTC Final : ड्रिंक्स ब्रेकदरम्यान कॅप्टन रोहितला ‘टिप्स’ देताना दिसला अश्विन, सर्वत्र रंगलीय फोटोची चर्चा
  • कर्णधार-प्रशिक्षक जोडीवर सुनील गावसकर नाराज! समालोचन करतानाच केली आगपाखड
  • विराट की स्मिथ, कोण आहे सर्वोत्तम फलंदाज? वाचा 3 माजी दिग्गजांची उत्तरे
  • WTC फायनलचा पहिला दिवस स्मिथ-हेडच्या नावे, ऑस्ट्रेलियाकडून 300 धावांचा टप्पा पार
  • ‘बीसीसीआयने विराटवर अन्याय केला…’, WTC Finalदरम्यान माजी ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचे खळबळजनक भाष्य
  • ICC बादफेरीत चमकला स्मिथ, ‘या’ विक्रमात कॅलिस-संगकाराची बरोबरी, पण विराटचा रेकॉर्ड मोडण्यात अपयशी
  • मोठ्या मंचावर स्मिथची बॅट पुन्हा तळवली, भारताविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा हेडननंतर दुसरा ऑस्ट्रेलियन
  • WTC फायनलच्या पहिल्या शतकाचा मानकरी ठरला हेड, 1 षटकार आणि 14 चौकार ठोकत रचला इतिहास
  • कुस्तीपटूंना दिलासा! क्रीडा मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय, बजरंग पुनियाने दिली माहिती
  • भरतने लंडनमध्ये दाखवली चित्त्याची चपळाई, खोऱ्याने धावा काढणाऱ्या वॉर्नरचा ‘असा’ काढला काटा, Video
  • ‘हे काय गार्डन बनवलंय’, ओव्हलची खेळपट्टी पाहून चाहते हैराण, युजरच्या प्रश्नावर कार्तिकचा भन्नाट रिप्लाय
  • डीआरएस घ्यावा तर ‘असा’, WTC फायनलमध्येही रोहित शर्माने दाखवला खोडसाळपणा
  • WTC Finalमध्ये टॉवेल गुंडाळून का फिरत होता शमी? दिग्गज गोलंदाजाचा मोठा खुलासा
  • सचिन, व्हीव्हीएस आणि द्रविडच्या यादीत जागा बनवणार विराट कोहली! डब्ल्यूटीसी फायनलमध्ये करणार रेकॉर्ड
  • WTC Final: मार्नस लाबुशेनने हवेतच सोडली बॅट, मोहम्मद सिराजचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
  • अर्रर्र! तोंडघशी पडता पडता वाचला रोहित शर्मा; नेटकरीही म्हणाले, ‘…आणि हा भारतीय संघ सांभाळतोय…’
  • सर्वात महत्त्वाच्या सामन्यातून अश्विनची हाकालपट्टी, अनुभवी गोलंदाजाविषयी काय म्हणाला रोहित? लगेच वाचा
  • डब्ल्यूटीसी फायनलमध्ये दोन्ही कर्णधारांसाठी अजब योगायोग! कारकिर्दीतील खास टप्प्याचे साक्षीदार बनले ओव्हल मैदान
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In