मुंबई । माजी भारतीय वेगवान गोलंदाज इरफान पठाणने 2008 च्या सिडनी कसोटीवर खुलासा केला की त्या कसोटीत एक नव्हे तर सात चुका झाल्या होत्या. आणि या कसोटीत वाद देखील निर्माण झाला होता. या चुकामुळे पंच स्टीव्ह बकनर निशाण्याखाली आले होते.
नुकतेच त्यांनी तो सामना आठवत चूक कबूल केली. त्यावेळी पठाण हा भारतीय संघाचा सदस्य होता. तो म्हणाला की, “पंचांच्या चुकीमुळे आम्ही ती कसोटी सामना गमावला.”
स्पोर्ट्स चॅनेलशी बोलताना पठाण म्हणाला की, “तुम्ही तुमच्या चुका कितीही मान्य केल्या तरी आम्ही कसोटी सामना गमावला आहे. मला आठवते, मी 2003 साली ऑस्ट्रेलियामध्ये ऍडिलेड येथे झालेल्या सामन्यांमधून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आणि आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये 21 वर्षांनंतर कसोटीत विजय मिळवला होता. सिडनीत मात्र फक्त पंचांच्या त्रुटींमुळे कसोटी सामना गमावला? आता पंच काय म्हणतात याने काही फरक पडणार नाही.”
त्याने सांगितले की, “सिडनी कसोटी सामन्यात फक्त एकच चूक नव्हती तर सात चुका झाल्या, ज्यामुळे पराभव स्वीकारावा लागला. अँड्र्यू सायमंड्स खेळत होता, तेथे चुका झाल्या होत्या आणि तो जवळजवळ बाद झाला. मला आठवते, तीन वेळा पंचानी त्याला बाद दिले नाही. 30 च्या स्कोअरवर बकनरने सायमंड्सला झेलबाद देण्यास नकार दिला. त्याने 162 धावा केल्या आणि सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने गेला.”
“आमचा 122 धावांनी पराभव झाला आणि तो सामनावीर ठरला. अँड्र्यू सायमंड्सविरुद्ध हा निर्णय झाला असता तर आम्ही सहज सामना जिंकू शकलो असतो. हे संघासाठी निराशादायक होतं. पहिल्यांदा मी भारतीय क्रिकेटपटूंना रागाच्या भरात पाहिले. चाहत्यांच्या मनात एकच गोष्ट होती की पंचांनी ऑस्ट्रेलिया जिंकण्याच्या उद्देशाने हे सर्व केले. पण एक क्रिकेटर म्हणून आम्ही काही विचार करू शकलो नाही. आम्हाला वाटले की झाले ते ठीक आहे आणि आम्ही पुढे जाऊ. पण 7 चुका. आपण काय चेष्टा करत होता. हे आमच्यासाठी अविश्वसनीय आणि न पचणारे होते,” असे इरफान पठाणने नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
–१४० किलो वजनाच्या वेस्टइंडीजच्या खेळाडूने पकडला अप्रतिम झेल, कॅप्टनही झाला अवाक्
–चीयरलीडर्स ते स्ट्रॅटेजिक टाईम आऊट, पहा काय काय होणार आयपीएल २०२०मध्ये बदल
–निराशाजनक! पदार्पणाच्या वनडे सामन्यातच नर्वस नाइंटिजचे शिकार झालेले ५ क्रिकेटपटू
–टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ३- गब्बरची कसोटी क्रिकेटमध्ये जबर एन्ट्री
–अगदी सौरव तिवारीपासून ‘या’ ६ कर्णधारांच्या अंडर खेळलाय धोनी