बॉलिवूडची नामांकित अभिनेत्री प्रीति झिंटा हिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. सिनेसृष्टीत गाजलेली ही अभिनेत्री क्रिकेट क्षेत्रातही तितकीच परिचित आहे. यामागचे कारण म्हणजे, जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगमधील तिचा पंजाब किंग्ज संघ. अभिनयाची आवड असलेल्या प्रीतिला क्रिकेटमध्येही रस आहे.
परंतु तिच्यात क्रिकेट क्षेत्राची ओढ कशी निर्माण झाली? तिने आयपीएलचा पंजाब किंग्ज संघ कोणत्या कारणामुळे विकत घेतला? हे फार कमी जणांना माहित असावे. चला तर जाणून घेऊया, या प्रश्नांची उत्तरे.
प्रीति तिचे आई-वडील आणि २ भावांसोबत शिमला येथे राहत होती. तिचे वडील दुर्गानंद हे एक लष्करी अधिकारी होते, ज्यांना शिमला येथे एक क्रीडा क्लब बनवायची ईच्छा नेहमीच होती. जेणेकरुन देशातील तरुणांना खेळाकडे प्रोत्साहित केले जावे. या स्वप्नाचा उल्लेख ते आपली मुलगी प्रीति झिंटाकडे अनेक वेळा करत असत.
मात्र, प्रीति झिंटाच्या वडिलांची ही इच्छा अपूर्णच राहिली. कारण प्रीति अवघ्या १३ वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा अपघात झाला होता. ज्यामध्ये प्रीतिच्या वडिलांचे निधन झाले आणि तिची आई जवळजवळ २ वर्षे अंथरुणावर राहिली. माध्यमांतील वृत्तानुसार, आई-वडिलांच्या अपघातानंतर सर्व जबाबदारी प्रीतिच्या खांद्यावर येऊन पडली. कारण ती भावंडांमध्ये सर्वात मोठी होती.
मोठी झाल्यावर तिने प्रथम मॉडेलिंगच्या जगात पाऊल ठेवले आणि नंतर चित्रपटांमध्ये प्रवेश केला. शाहरुख खानसोबत ‘दिल से’ चित्रपटात काम करून तिने आपल्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर प्रीतिने कधीच मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटानंतर प्रीति झिंटाने एकामागून एक अनेक जबरदस्त चित्रपटांमध्ये काम केले आणि प्रेक्षकांच्या हृदयात आपली खास ओळख निर्माण केली.
सुपरस्टार झाल्यानंतरही प्रीति आपल्या वडिलांची इच्छा विसरली नाही. त्याच वेळी आयपीएल सुरू होत असताना तिने आपल्या वडिलांची ही अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचा विचार केला आणि आयपीएलमध्ये एक संघ विकत घेतला. भलेही ती क्रीडा क्लबची मालकीण झाली नाही, परंतु क्रीडा संघाची मालकीण नक्की ठरली.
महत्त्वाच्या बातम्या-
विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात कशी असेल भारताची सलामी जोडी? ‘हे’ आहेत ४ पर्याय
‘रोहित शर्माला इंग्लंडमध्ये कसोटीत खेळणं जाणार महाकठीण, कारण…’
संधीची प्रतिक्षा! तब्बल २३७ विकेट्स अन् १३११ धावा, ‘सौराष्ट्रचा जडेजा’ ठोठावतोय टीम इंडियाचं दार