संपुर्ण नाव- मदनलाल उद्धवराम शर्मा
जन्मतारिख- 20 मार्च, 1951
जन्मस्थळ- अमृतसर, पंजाब
मुख्य संघ- भारत, दिल्ली आणि पंजाब
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 6 जून ते 11 जून, 1974
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 13 जुलै, 1974
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी: सामने- 39, धावा- 1042, सरासरी- 22.65
गोलंदाजी: सामने- 39, विकेट्स- 71, सर्वोत्तम कामगिरी- 5/23
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी: सामने- 67, विकेट्स- 73, सर्वोत्तम कामगिरी- 4/20
गोलंदाजी: सामने- 67, धावा- 401, सरासरी- 19.09
थोडक्यात माहिती-
-मदनलाल यांनी प्रथम श्रेणी सामन्यात 42.87च्या सरासरीने 10204 धावा केल्या होत्या. याचबरोबर 25.50च्या सरासरीने 625 विकेट्स घेतल्या
-मदनलाल यांनी 1968-69मध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी तिसऱ्या रणजी सामन्यात जम्मू-काश्मीर संघाविरुद्ध 8 विकेट्स घेतल्या होत्या. तर, 1971-72मध्ये दिल्ली विरुद्धच्या सामन्यात 53 धावा देत 7 विकेट्स घेतल्या होत्या.
-एकंदरीत त्यांनी त्यांच्या रणजी कारकिर्दीत 5270 धावा आणि 351 विकेट्स घेतल्या होत्या. त्यांचा हा विक्रम राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ठ होता.
– त्यांच्या गोलंदाजीच्या शैलीमुळे 1977-78मध्ये त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यास संधी देण्यात आली होती. यावेळी झालेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेपैकी पहिल्या 2 सामन्यात त्यांनी एकूण 9 विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात त्यांनी घेतलेल्या 5 विकेट्सचा समावेश आहे.
-निवृत्तीनंतर मदनलाल हे भारतीय अ संघाचे प्रशिक्षक बनले. तसेच, सध्या त्यांची बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीमध्ये (CAC) निवड झाली आहे.