संपुर्ण नाव- मनिष कृष्णानंद पांडे
जन्मतारिख- 10 सप्टेंबर, 1989
जन्मस्थळ- नैनिताल, उत्तरांचल
मुख्य संघ- भारत, बेलगावी पॅन्थर्स, भारत पेट्रोलियम कार्पोरेटेड लिमीटेड, भारत अ, भारत ब, इंडिया ब्ल्यू, इंडिया इमर्जिंग प्लेयर्स, इंडिया रेड, 19 वर्षांखालील भारतीय संघ, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, कर्नाटक, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन एकादश, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, म्हैसूर वॉरियर्स, पुणे वॉरियर्स, शेष भारतीय संघ, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दक्षिण विभाग आणि सनराइजर्स हैद्राबाद
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 14 जुलै, 2015, ठिकाण – हरारे
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 17 जुलै, 2015, ठिकाण – हरारे
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 26, धावा- 492, शतके- 1
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 38, धावा- 707, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-उत्तरांचल येथील नैनिताल येथील जन्मलेला मनिष पांडे हा वयाच्या 15व्या कुंटुंबासोबत बेंगलोर येथील स्थायी झाला. त्याचे वडिल हे आर्मीत होते.
-प्रशिक्षक सतिश यांनी पांडेला सुरुवातीच्या काळा प्रशिक्षण दिले. तो कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनमध्ये जाईपर्यंत त्यांनी त्याला प्रशिक्षण दिले. ते कर्नाटक, हरियाणा आणि ओडिसा संघाचे माजी प्रशिक्षक होते.
-जर क्रिकेटमध्ये कारकिर्द घडली नाही तर मनिषने त्याच्या वडिलांप्रमाणे आर्मी ऑफिसर बनायचे ठरवले होते. पण तसे झाले नाही.
-मधल्या फळीतील फलंदाज पांडेने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात म्हैसूरकडून राज्य स्तरावरील क्रिकेट स्पर्धेतून केली होती.
-2008मध्ये मलेशियात झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकाचा पांडे भाग होता.
-पांडे प्रसिद्धिस तेव्हा आला, जेव्हा त्याने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून 73 चेंडूत 114 धावा केल्या. 2009मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने ही शतकी खेळी केली होती.
-तो 2009-10 या रणजी ट्रॉफी हंगामात 4 शतके आणि 5 अर्धशतकांसह 882 धावा घेत, संपूर्ण हंगामात सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू होता.
-2009-10मध्ये कर्नाटक विरुद्ध मुंबई संघातील अंतिम सामन्यात पांडेची मोठी खेळी संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली होती. त्याने कर्नाटककडून खेळताना चौथ्या डावात 144 धावा केल्या होत्या आणि संघाने अवघ्या 6 धावांनी त सामना गमावला होता.
-रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर, 2011मध्ये पांडेला पुणे वॉरियर्सने विकत घेतले होते.
-2014मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना पांडे सामनावीर बनला होता. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध त्याने 94 धावा करत संघाला विजय मिळवून दिला होल्याने तो सामनावीर ठरला होता.
-झिम्बाब्वेविरुद्ध 2015मध्ये पांडेने वनडे पदार्पण केले होते. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच 71 धावांसह केदार जाधवसोबत 144 धावांची भागिदारी केली होती.
-राहूल द्रविड हा पांडेचा आदर्श क्रिकेटपटू आहे.
-2014मध्ये कर्नाटक प्रिमीयर लीगमधील म्हैसूर वॉरियर्स संघाकडून पांडे खेळला होता. तसेच त्याने संघाला चषकडी मिळवून दिले होते.
-तमिळ फिल्म अभिनेत्री अश्रिता शेट्टी हिच्याशी 2019मध्ये पांडेने लग्न केले. तिने उदयम एन एच 4, इंद्रजित या तमिळ चित्रपटात काम केले आहे.