Loading...

पीएमडीटीए वरिष्ठ टेनिस मालिका स्पर्धेत रवी कोठारीचा मानांकीत खेळाडूवर विजय

पुणे। पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजीत वरिष्ठ टेनिस मालिका स्पर्धेत बिगर मानांकीत रवी कोठारीने आठव्या मानांकीत पार्थ मोहपात्राचा पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत 35 वर्षावरील गटात पहिल्या फेरीत बिगर मानांकीत रवी कोठारीने आठव्या मानांकीत पार्थ मोहपात्राचा 7-4 असा पराभव करत अनपेक्षित निकाल नोंदविला. अव्वल मानांकीत जॉय बॅनर्जीने महेश पारगावकरचा 7-0 असा पराभव केला. अनिल क्षीरसागरने डॉ. विकास बचलुचा 7-4 असा पराभव करत आगेकुच केली. सी कुमारने जयन किशनचा तर हरिष बी याने विशाल तिवारीचा अनुक्रमे 7-0 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

45 वर्षावरील गटात राउंड रॉबिन फेरीत गट ब मध्ये सुनिल लुल्लाने अनुराग शर्माचा 7-6(2) तर नितिन फडतरेचा 7-5 असा पराभव केला. मदार मेहेंदळेने संदिप वाकचौरेचा 7-0 व संदिप आपटेचा 7-5 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. गट क मध्ये मनोज देशपांडेने नितिन गवळीचा 7-3 असा तर उमेश भिडेचा 7-3 असा पराभव केला.

स्पर्धेचे उद्घाटन माजी डेव्हिस कप खेळाडू व मेजर ध्यानचंद पुरस्कार विजेते नितिन किर्तने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे, पीएमडीटीएचे सहायक सचिव हिमांशू गोसावी, डेक्कन जिमखाना क्लबचे सदस्य अजय कामत, स्पर्धा सुपरवायझर सुजन परब आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल-
दुसरी फेरी
35 वर्षावरील गट-

जॉय बॅनर्जी(1) वि.वि महेश पारगावकर 7-0;
अमित रानडे वि.वि मनोज देशपांडे 7-5;
सी कुमार वि.वि जयन किशन 7-0;
हरिष बी वि.वि विशाल तिवारी 7-0;
रवी कोठारी वि.वि पार्थ मोहपात्रा(8) 7-4;
अनिल क्षीरसागर वि.वि डॉ. विकास बचलु 7-4;

45 वर्षावरील गट-
राउंड रॉबिन फेरी:

Loading...

गट ब- सुनिल लुल्ला वि.वि अनुराग शर्मा 7-6(2);
सुनिल लुल्ला वि.वि नितिन फडतरे 7-5;
मदार मेहेंदळे वि.वि संदिप वाकचौरे 7-0;
मंदार मेहेंदळे वि.वि संदिप आपटे 7-5;

गट क- मनोज देशपांडे वि.वि नितिन गवळी 7-3;
मनोज देशपांडे वि.वि उमेश भिडे 7-3;

You might also like
Loading...