विराट कोहलीच्या नेतृत्वातील वरिष्ठ भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले. त्यानंतर आता इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. तत्पूर्वी, भारतीय खेळाडू युरोपमध्ये सुट्ट्या घालवत असून, विविध खेळाडूंना व प्रशिक्षकांना वेगवेगळ्या ठिकाणी पाहण्यात आले. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील या काळात प्रसिद्ध विम्बल्डन स्पर्धेचा आनंद लुटला.
रवी शास्त्री यांनी लुटला विम्बल्डनचा आनंद
भारतीय संघाला इंग्लंड विरुद्धच्या मालिकेआधी १३ जुलैपर्यंत सुट्ट्या घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. याचाच फायदा घेत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विम्बल्डनचे मैदान गाठले. सोमवारपासून (२८ जून) वर्षातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेला लंडन येथे सुरुवात झाली. त्यानंतर, स्पर्धेच्या चौथ्या दिवशी दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याचा सामना पाहण्यासाठी शास्त्री सेंटर कोर्टवर पोहोचले.
रॉजर फेडररचा सामना पाहण्यासाठी गेलेल्या शास्त्री यांनी तेथून एक छायाचित्र ट्विटरवर पोस्ट केले. त्या छायाचित्राला त्यांनी
‘विम्बल्डनमध्ये पुन्हा येऊन छान वाटले. एक महान परंपरा. सेंटर कोर्टने थोडा इशारा दिला.’ रॉजर फेडररने या स्पर्धेतील आपला दुसऱ्या फेरीचा सामना रिचर्ड गास्केटविरुद्ध खेळला. गास्केटविरूद्ध पहिले तीन्ही सेट जिंकत त्यानी सामना खिशात घालत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. त्याला पहिल्या फेरीत एड्रियन मनारिनो याने चांगलेच झुंजवले होते.
Great to be back on a sunny day at @Wimbledon. Great tradition. Centre court beckons in a bit 🙌🏻 pic.twitter.com/tZ1PCIzhQr
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) July 1, 2021
भारतीय खेळाडू लुटत आहेत मजा
शास्त्री यांच्याप्रमाणे इतर भारतीय खेळाडू युरोपमध्ये फिरताना दिसत आहेत. भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे व प्रमुख फलंदाज रोहित शर्मा हे आपल्या कुटुंबासह वेळ घालवताना दिसले. तर, युवा यष्टीरक्षक रिषभ पंत याने युरो कपमधील इंग्लंड विरुद्ध जर्मनी हा सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
वेध ‘माही’च्या वाढदिवसाचे! जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशीच धोनी ट्रेंडमध्ये, पाहा काही खास पोस्ट