आयपीएल २०२१ मध्ये शनिवारी (१ मे) चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) विरुद्ध मुंबई इंडियन्स असा सामना खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सीएसकेच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अंबाती रायुडूने धुवाधार अर्धशतक ठोकले. या खेळी दरम्यान त्याने आपल्या जोरदार फटक्याने मैदानाबाहेरील फ्रिज फोडला. हा व्हिडिओ चांगला व्हायरल होऊ लागला आहे.
रायुडूची तुफानी फलंदाजी
मोईन अली, फाफ डू प्लेसिस व सुरेश रैना लागोपाठ बाद झाल्यानंतर सीएसकेची काहीशी घसरगुंडी झाली. मात्र, त्यानंतर अंबाती रायुडू व रवींद्र जडेजा यांनी संघाचा डाव सावरला. रायुडूने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने अवघ्या २७ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार व ७ उत्तुंग षटकारांच्या मदतीने २६६ च्या सरासरीने नाबाद ७२ धावा बनवल्या.
रायुडूने फोडला फ्रिज
सीएसकेच्या डावातील एकोणिसाव्या षटकात रायुडूने मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहची चांगली धुलाई केली. त्याने लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला षटकार सरळ मुंबई इंडियन्सच्या डग आऊटमधील फ्रिजच्या काचेवर आदळला. याच हंगामात यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोने मुंबईविरुद्धच अशाच प्रकारे एक फटका खेळत डग आऊटमधील फ्रिज फोडला होता.
Tod dala….
Rayudu smashed not only Bumrah but also broke mumbai indians fridge too😂.. pic.twitter.com/WlsyiT8xpQ— मुंबई Matters™ (@mumbaimatterz) May 1, 2021
चेन्नईचा धावांचा डोंगर
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड या सामन्यात अपयशी ठरला. मात्र, फाफ डू प्लेसिसने सलग चौथे अर्धशतक साजरे केले. मोईन अलीने आक्रमक ५८ धावा केल्या. रायुडूने मुंबईच्या सर्व गोलंदाजांचा समाचार घेत संघाला २१८ धावांपर्यंत मजल मारून दिली.
पोलार्डने जिंकून दिले मुंबईला
चेन्नईने दिलेल्या २१९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून कायरन पोलार्डने ३४ चेंडूत ८ षटकार आणि ६ चौकारांसह नाबाद ८७ धावा करत मुंबईला विजय मिळवून दिला. मुंबईने अखेरच्या चेंडूवर हे आव्हान पूर्ण करत सामना जिंकला. मुंबईचा हा या हंगामातील चौथा विजय ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईविरुद्ध अर्धशतक करताच फाफ डू प्लेसिस ‘असा’ कारनामा करणारा बनला चेन्नईचा पहिलाच फलंदाज
चेन्नईकडून खेळताना अंबाती रायडूची कमाल! धोनीच्या या मोठ्या विक्रमाची केली बरोबरी
पंड्या बंधूंचा कौतुकास्पद निर्णय; भारतातील ग्रामीण भागात करणार ‘इतक्या’ ऑक्सिजन कॉन्संट्रेटरची मदत