भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या त्याच्या करकिर्दीतील सर्वात खराब फॉर्मशी झगडत आहे. विराट मागच्या जवळपास २ वर्षांपासून त्याच्या प्रतिभेनुसार खेळत नाहीये. चाहते त्याचा जुना फॉर्म पुन्हा पाहण्यासाठी वाट बघत आहेत. अनेक दिग्गजांनी विराटला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगचा देखील सहभाग आहे. पॉंटिंगला असेही वाटते की, विराट स्वतःला चकवा देण्याचा प्रयत्न करत आहे.
सतत क्रिकेट खेळत असल्यामुळे कोणत्याही खेळाडूंना थकवा येणे सहाजिक आहे. विराट कोहली (Virat Kohli) देखील सध्या थकल्यासारखा वाटत आहे. त्याला मोठ्या विश्रांतीची गरज असल्याचे मत अनेकांनी यापूर्वी व्यक्त करून दाखवले आहे. यामध्ये रिकी पॉंटिंग (Ricky Ponting) हे नाव देखील आहे. अशात आयसीसी रिव्यूमध्ये बोलताना पॉंटिंगने विराटविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार विराटविषयी म्हणाला की, “प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात एकदा अशा गोष्टी नक्की येतात. विराट मागच्या १० ते १२ वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे आणि त्याने एवढा वाईट काळ आधी कधीच पाहिला नव्हता. आयपीएलमध्ये त्याला पाहिल्यानंतर सर्वत्र अशीच चर्चा सुरू झाली की, विराट थकलेला आहे. मला वाटते त्याने याविषयी विचार केला पाहिजे आणि सुधारणेसाठी मार्ग शोधला पाहिजे. मग ती टेक्निकल असो किंवा मानसिक.”
“एक गोष्ट आहे, जी मला माझ्या अनुभवामुळे माहिती आहे. ती म्हणजे, एक खेळाडू म्हणून तुम्ही नेहमी स्वतःला चकवा देत असता की, तुम्ही थकलेला नाहीत. याठिकाणी तुम्ही असे मानता की, शारीरिक किंवा मानसिक रूपात तुम्ही थकलेला नाहीत. अशा पद्धतीने तुम्ही नेहमी स्वतःला सरावासाठी आणि सामन्यासाठी तयार ठेवण्यासाठी मार्ग शोधता. अशा कारणास्तव तुम्ही काही दिवसांनंतर स्वतःला खूप थकलेला पाहाल. मला वाटते की, विराटसोबत देखील असेच काहीतरी होत आहे. परंतु त्याच्यासोबत ही गोष्ट जास्त काळ राहणार नाहीत,” असेही पॉटिंगने पुढे सांगितले.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील टी-२० मालिकेत विराट खेळत नाहीये. विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या दिग्गजांना या टी-२० मालिकेतून विश्रांती दिली गेली आहे. पुढच्या महिन्यात असलेल्या इंग्लंड दौऱ्यासाठी मात्र या सर्वांचे संघात पुनरागमन होणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दुसऱ्या सामन्यासाठी Cuttack शहरात पोहोचताच भारतासह दक्षिण आफ्रिकी खेळाडूंचे जंगी स्वागत, Video Viral
काय सांगता! आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारा ‘हा’ दिग्गज खेळाडू करणार पुनरागमन?