---Advertisement---

दुसऱ्या वनडेआधी टीम इंडियाला मोठा धक्का, हा खेळाडू झाला संघाबाहेर

On: गुरूवार, जानेवारी 16, 2020 11:47 AM
---Advertisement---

राजकोट। उद्या(17 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, राजकोट येथे होणार आहे. मात्र या सामन्याआधीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत दुसऱ्या वनडे सामन्यातून बाहेर पडला आहे.

त्याला मंगळवारी(14 जानेवारी) पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यादरम्यान फलंदाजी करताना पॅट कमिन्सने टाकलेला चेंडू हेल्मेटला लागल्याने दुखापत झाली होती. या सामन्यात त्याने दुखापतीमुळे यष्टीरक्षणही केले नव्हते. त्याच्याऐवजी केएल राहुलने यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती.

बीसीसीआयने दुसऱ्या वनडेसाठी पंतचा बदली खेळाडू म्हणून कोणाचीही निवड केली नसल्याने राहुलच यष्टीरक्षण करेल.

पंत भारतीय संघाबरोबर राजकोटलाही गेलेला नाही. त्याला आता बंगळूरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबिलिटेशनसाठी जावे लागणार आहे.

त्याच्या दुखापतीबद्दल बीसीसीयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ‘पंत दुसऱ्या वनडेतून बाहेर पडला आहे. त्याची तिसऱ्या वनडेतील उपलब्धता तो रिहॅबिलिटेशनमध्ये कसा प्रतिसाद देतो त्यावर अवलंबून असेल.’

तसेच बीसीसीआयने माहिती दिली आहे की त्याला चेंडू लागल्यानंतर हॉस्पिटलमध्ये रात्रभर विशेषज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते गेले. पण आता तो स्थिर असून त्याचे स्कॅन रिपोर्टही चांगले आले आहेत. त्याला हॉस्पिटलमधून सोडण्यात आले आहे. आता तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाईल.

पंतने पहिल्या वनडेत 33 चेंडूत 28 धावा केल्या होत्या. या सामन्यात भारताला 10 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---