कोरोना व्हायरसमुळे जगभरात सध्या लाॅकडाऊन आहे. भारतातही लाॅकडाऊन असल्याने खेळांच्या सर्व स्पर्धा रद्द केल्या आहेत. भारतात या काळात आयपीएल सुरु असते परंतु कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.
यामुळे भारतीय क्रिकेटपटू सध्या आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहे. त्यामुळे अनेक खेळाडू घरातील छोट्या मोठ्या किस्स्यांचे व्हिडीओही सोशल मिडीयावर पोस्ट करत आहे.
असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यात रोहित शर्माची १ वर्षांची मुलगी समायरा जसप्रीत बुमराहची नक्कल करताना दिसत आहे. हा व्हिडीओ खुद्द बुमराहनेच ट्विटरवर शेअर केला आहे.
“ती माझी नक्कल रोहितपेक्षा चांगली करतेय. ती जशी माझी फॅन आहे त्यापेक्षाही मी तिचा खूप मोठा फॅन आहे. ” असे ट्विट बुमराहने केले आहे.
I think she does it better than me @ImRo45 @ritssajdeh!I can safely say I am a bigger fan of hers than she is of me. 😇 pic.twitter.com/rHP5g52e20
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) April 3, 2020
बुमराह व रोहित भारतीय संघाबरोबरच मुंबई इंडियन्समध्येही एकमेकांचे संघसहकारी आहेत. मुंबईला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्यात या दोघांचा मोठा वाटा आहे. She does it better than me: Rohit Sharma’s daughter imitates Jasprit Bumrah’s bowling action.
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण