मुंबई इंडियन्सला आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ बनवण्यात ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा मोलाचा वाटा आहे. रोहितने त्याच्या नेतृत्त्वाखाली ४ वेळा मुंबई इंडियन्सला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे. रोहितच्या मते एका कर्णधारासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, ‘निस्वार्थ राहणे’ आणि स्वत:ला आपल्या संघातील ‘सर्वात कमी महत्त्वाची व्यक्ती’ म्हणण्यामध्ये रोहितला तिळभरही कमीपणा वाटत नाही. Rohit Sharma Says That As A Captain I’m The Least Important In My Team
रोहित पीटीआयशी बोलताना म्हणाला की, “मी या गोष्टीवर विश्वास ठेवतो की, जेव्हा तुम्ही संघाचे कर्णधार असता. तेव्हा तुम्ही संघातील सर्वात कमी महत्त्वाचे व्यक्ती असता. कारण, जेव्हा मोठ्या हिताची गोष्ट पुढे येते, तेव्हा संघातील इतर खेळाडू जास्त महत्त्वाचे बनतात. वेगवेगळ्या कर्णधारांसाठी ही गोष्ट वेगळी असते. पण मी या गोष्टीशी पूर्णपणे सहमत आहे.”
रोहित पुढे बोलताना म्हणाला की, “हा माझा स्वभाव आहे. कारण, आपण दुसऱ्यांप्रमाणे स्वत:ला दाखवण्याचा प्रयत्न नाही करत. आपण जे आहोत, नेहमी तसेच राहण्याचा प्रयत्न करतो. कधी-कधी आपल्याला राग येतो. पण, आपण आपल्या संघातील खेळाडूंवर आपला राग काढत नाही, हे सर्वात महत्त्वाचे असते. आपल्या भावनांना मनात दडवून ठेवणे खूप अवघड काम असते.”
रोहितला वाटते की, आयपीएल सुरु होण्यापुर्वी त्याच्याकडे खूप वेळ आहे आणि तो मोठ्या ब्रेकनंतर पुढील महिन्यात आयपीएलमध्ये हळूहळू आपली पकड घट्ट करेल. “आशा आहे की, या आठवड्यात जिम सुरु होतील आणि मी इनडोअर सराव करु शकेल. कारण, यावेळी मुंबईतील वातावरणाला पाहता, खेळाडू आउटडोअर सराव करु शकत नाहीत. मी इनडोअर सुविधांच्या वापरासाठी मुंबई क्रिकेट संघाला पत्र लिहीन,” असे तो पुढे बोलताना म्हणाला.
भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्यामुळे आयपीएलचा १३वा हंगाम युएईमध्ये आयोजित केला जाणार आहे. आयपीएल २०२०ची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. तर आयपीएलचा अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अपंग भारतीय क्रिकेटर्सचे होतायत हाल, सौरव गांगुलीकडून आहे मदतीची अपेक्षा
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२० – या ५ युवा परदेशी खेळाडूंच्या कामगिरीवर असेल सर्वांची नजर…
आयपीएलमध्ये खेळाडू आणि कर्णधार म्हणून सुपर डुपर फ्लॉप ठरलेले ४ दिग्गज