भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यादरम्यान तीन भारतीय खेळाडूंच्या बॅटमधून झंझावाती शतके पाहायला मिळाली. तत्पूर्वी भारताने तिसऱ्या दिवशी बांगलादेशला 515 धावांचे लक्ष्य दिले आहे. दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान रोहितचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या खेळाडूंना फटकारले आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान रोहित शर्मा (Rohit Sharma) एका क्षेत्ररक्षकावर चिडताना दिसला. तो म्हणाला, “अरे सगळे झोपले आहेत.” मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित कोणावर ओरडला हे स्पष्ट झाले नाही.
Rohit sharma the captain 😂😂😂pic.twitter.com/pJoFtgRXdH
— SKIPPER (@skipperjatt) September 21, 2024
बांगलादेशविरूद्ध कसोटीमध्ये रोहितचे रेकाॅर्ड्स अद्याप चांगले राहिले नाहीत. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना तो अवघ्या 6 धावांवर बाद झाला, तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 5 धावांवर बाद झाला. दोन्ही डावात रोहित फ्लाॅप झाला. पण पहिल्या डावात भारतासाठी रविचंद्रन अश्विनने शानदार शतकी खेळी केली, तर दुसऱ्या डावात युवा शुबमन गिल (Shubman Gill) आणि रिषभ पंतने (Rishabh Pant) शानदार शतके झळकावली आणि बांगलादेशसमोर 515 धावांचे आव्हान ठेवले.
रोहितने आतापर्यंत बांगलादेशविरुद्ध 4 कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने पाच डावात फलंदाजी करताना 8.80च्या सरासरीने 44 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 21 राहिली. आता बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) ही आकडेवारी बदलण्यात यशस्वी राहिल का? हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरेल. भारत-बांगलादेश संघातील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ कारणांमुळे शुबमन गिल होणार भारताचा पुढील कर्णधार?
भारत विजयापासून 6 विकेट दूर, बांगलादेशला चमत्काराची आवश्यकता; तिसऱ्या दिवसाचा हाल जाणून घ्या
दिल्ली कॅपिटल्सचं ठरलं! या 5 खेळाडूंना करणार रिटेन; रिषभ पंतबाबत मोठं अपडेट