विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ सध्या जोरदार कामगिरी करत आहे. या संघाने आतापर्यंत एकूण १२ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याला ८ सामने जिंकण्यात यश आले आहे. हा संघ १६ गुणांसह सध्या तिसऱ्या स्थानी आहे. तर उर्वरित ३ सामन्यांपैकी एक सामना जिंकून हा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. त्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ सध्या जोरदार कामगिरी करत आहे. दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे सोशल मीडिया अकाऊंट नेहमी सक्रिय असते. ते खेळाडूंचे सराव करत असतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच त्यांनी यझवेंद्र चहलचा मजेशीर व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यावर चाहते देखील भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.
नुकताच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, संघातील मुख्य गोलंदाज युझवेंद्र चहल नेट्समध्ये फलंदाजी करताना दिसून येत आहे. गोलंदाजी करताना फलंदाजांचा घाम काढणारा युझवेंद्र चहल सध्या फलंदाजीचे टॅलेंट दाखवताना दिसून येत आहे.या व्हिडिओ वर कॅप्शन देत त्यांनी, “युझीला असे वाटते की, तो आमच्यासाठी डावाची सुरुवात करू शकतो…” असे लिहिले आहे.
Yuzi thinks he can open the batting for us. 😁😉@yuzi_chahal #PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/hs0qTcVU5z
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) October 2, 2021
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मजेशीर ट्विट केल्यानंतर यात काहीच शंका नव्हती की, युझवेंद्र चहल या ट्विटला मजेशीर प्रतिसाद देणार. त्याने हा व्हिडीओ रिट्विट केला आणि ‘नंबर ३’ असे लिहिले आहे. त्याचे असे म्हणणे आहे की, त्याला जर वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली तर तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.
No.3 ❤️💪 https://t.co/9T5yPXAkBb
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) October 2, 2021
युझवेंद्र चहल देखील सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतो. तो मजेशीर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतो.
महत्त्वाच्या बातम्या –
“टेस्ट चॅम्पियनशीप फायनलपेक्षाही भारताला त्यांच्या घरात पराभूत करणे मोठे आव्हान”
जरा अजबच आहे जयस्वालच्या यशाचे रहस्य, कर्णधार म्हणतो…
चेन्नईविरुद्ध तुफानी फलंदाजी केल्यानंतर शिवम दुबे म्हणाला, ‘मी संधीची वाटच पाहत होतो…’