भारत या विविधतेने भरलेल्या देशात बरेचसे सण-उत्सवही साजरे केले जातात. यातच दरवर्षी नव्या वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत (Makar Sankranti festival) होय. हिंदू धर्मातील ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या दिवशी सूर्य धनु रास सोडून मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी मकरसंक्रांत साजरी केली जाते. संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असलेल्या या सणाचा जल्लोष भारतीय क्रिकेटपटूही साजरे करत आहेत.
अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या सोशल मीडिया अंकाउंटद्वारे सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याच साखळीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याचेही नाव जोडले गेले आहे. भारताचा माजी फलंदाज सचिनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा (Sachin Tendulkar Makar Sankranti Wishes) दिल्या आहेत.
सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओत तो आपल्या एका मित्रासंगे गोल्फ कोर्टवर असल्याचे दिसत आहे. आपल्या हातात तिळगुळाने बनलेल्या लाडूचा डब्बा घेत त्याने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्याच्या आणि त्याच्या मित्राच्या चेहऱ्यावर मास्क असल्याचेही दिसते आहे. व्हिडिओच्या शेवटी त्याने सर्वांना महत्त्वाचा संदेशही दिला आहे. त्याने सर्वांना आपल्या जिवलगांसोबत मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यास तर सांगितले आहेच, सोबतच जागतिक महामारी कोविड-१९ पासून स्वत:ची आणि कुटुंबियांची काळजी घेण्यासही सांगितले आहे.
विशेष म्हणजे, जन्माने मुंबईकर असलेला सचिन या व्हिडिओत मराठी भाषेत बोलताना दिसतो आहे. त्याने मराठीत दिलेल्या शुभेच्छांनी चाहत्यांना भुरळ पाडली आहे. अनेकांनी त्याच्या या व्हिडिओला पसंती दर्शवत आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.
सचिनव्यतिरिक्त भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत यानेही ट्वीटरद्वारे चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा (Makar Sankranthi Wishes) दिल्या आहेत.
May this Makar Sankranti fill your life with good health, happiness, and love. Wishing you and your family a very Happy Makar Sankranti. ????
— Rishabh Pant (@RishabhPant17) January 14, 2022
दरम्यान २०१३ साली क्रिकेटला अलविदा केलेल्या सचिनने भारताकडून २०० कसोटी, ४६३ वनडे व एक कसोटी सामना खेळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर तब्बल १०० शतकं असून सर्वाधिक धावांचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. सचिनने वनडे व कसोटीत अनुक्रमे १८४२६ व १५९२१ धावा केल्या आहेत. सचिनला सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतरचा सर्वात महान फलंदाज समजले जाते.
महत्त्वाच्या बातम्या-
आणखी एका टी२० विश्वचषकाचे वाजले बिगुल; अतिमहत्त्वाच्या तारखांचा झाला खुलासा; तुम्हीही वाचा
ऑस्ट्रेलियाच्या कामी नाही आला ‘बचपन का याराना’, होबार्ट कसोटीत यजमानांची अतिवाईट सुरुवात
किती गोड!! पॅव्हेलियनमध्ये परतताना विराटची वामिकासोबत मस्ती, व्हिडिओ व्हायरल
हेही पाहा-