इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेत खेळाडूंचा मेगा लिलाव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.या लिलाव सोहळ्यापूर्वी सर्व जुन्या संघांना आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले होते. काही युवा खेळाडूंना कोट्यवधी रुपये देऊन रिटेन करण्यात आले आहे, तर अनेक दिग्गज खेळाडूंना रिलीज करण्यात आले आहे, जे आता लिलावात सहभागी होणार आहेत. अशातच राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसन, जोस बटलर आणि यशस्वी जयसवाल या तिघांना रिटेन केले आहे. दरम्यान पुढील हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार कोण असेल याबाबत कुमार संगकाराने मोठा खुलासा केला आहे.
आयपीएल २०२१ स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद युवा संजू सॅमसनच्या हाती देण्यात आले होते. परंतु, या संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. हा संघ गुणतालिकेत १० गुणांसह ७ व्या स्थानी होता. त्यामुळे अनेकांना असे वाटत होते की, संजू सॅमसनला रिटेन केले तरी, कर्णधार पदावरून काढून टाकले जाईल. परंतु, असे काहीच होणार नाही.
राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी म्हटले की, “आमच्या डेटा टीमने खरंच खूप मेहनत घेतली आहे. भारत आणि अमेरिकेतील भागीदारांनी मिळून हा निर्णय घेतला की, संजू सॅमसनला संघात कायम ठेवल्यास काही अडचण येणार नाही. तो येणाऱ्या वर्षातही राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार राहील. तो एक असाधारण खेळाडू आहे, त्याने हे वारंवार सिद्ध देखील केले आहे.”
संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्स संघाने २०१८ मध्ये ८ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते, तर आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी त्याला १४ कोटी रुपये देऊन रिटेन केले आहे. यासह युवा फलंदाज यशस्वी जयस्वालला ४ कोटी रुपये देऊन रिटेन करण्यात आले आहे.
यशस्वी जयस्वालबाबत बोलताना कुमार संगकारा म्हणाले की, “आम्ही युवा फलंदाज यशस्वी जयस्वालला रिटेन केले आहे. तो भविष्यात एक चांगला फलंदाज ठरू शकतो.” तसेच राजस्थान रॉयल्सने जोस बटलरला १० कोटी रुपये खर्च करत रिटेन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या जेमिसनचे शुबमनने केले ‘स्वॅग से स्वागत’, ठोकले ३ जबरदस्त चौकार
विश्रांती घेऊन आला विराट; नकोसा विक्रम करून गेला विराट
मुंबई कसोटीतून पुनरागमन करत ‘कर्णधार’ विराटने धोनीला सोडले मागे, ‘या’ विक्रमात बनला नंबर १