दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना मंगळवारी (12 सप्टेंबर) खेळला गेला. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलिया संघासमोर या सामन्यात यजमान संघाने 339 धावांचे मोठे आव्हान ठेवले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज सीन ऍबॉट याने सीमारेषेवर एक चकित करणारा झेल टिपला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना तुफानी फटकेबाजी केली. अनुभवी सलामीवीर क्विंटन डी कॉक याने आपला फॉर्म कायम राखताना स्फोटक 82 धावा तडकावल्या. कर्णधार बवुमाने 57 धावा केल्या. त्यानंतर अनुभवी ऐडन मार्करम याने शानदार शतक झळकावले. त्यामुळे यजमान संघ मोठी धावसंख्या उभी करू शकला.
One of the Greatest catches ever in cricket history. 🔥
Take a bow, Sean Abbott….!!!!!!pic.twitter.com/bXabNafgkV
— Johns. (@CricCrazyJohns) September 12, 2023
अखेरच्या टप्प्यात मार्करम व अष्टपैलू मार्को जेन्सन हे वेगाने धावा बनवत असताना 47 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर जेन्सन याने कव्हरच्या दिशेने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. त्याने मारलेला चेंडू षटकारापर्यंत जाणार असे वाटत असतानाच, सीन ऍबॉट याने धावत येत डाव्या हातावर सूर मारत एक अविश्वसनीय झेल पकडला. सोशल मीडियावर हा झेल मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
(Sean Abbott Took Stunner In South Africa And Australia Match)
महत्वाच्या बातम्या –
कर्णधार रोहित सोडला तर अख्खा भारतीय संघ फेल! दुनिथ वेललागेने घेतलं विकेट्सचं पंचक
भारताकडून पराभव मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बाबर आझमचा सन्मान! तिसऱ्यांदा केली ‘ही’ कामगिरी