Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शुभारंभ! अवघ्या 16 व्या सामन्यातच गिलने गाठले विक्रमादित्य सचिनला

January 10, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Shubman-Gill

Photo Courtesy: Twitter/ICC


भारत आणि श्रीलंका (INDvSL) यांच्यादरम्यान वनडे मालिकेतील पहिला मंगळवारी (10 जानेवारी) खेळला जात आहे. गुवाहाटीच्या बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी तडाखेबाज फलंदाजी करत भारतीय संघाला शतकी सलामी भागीदारी करून दिली. अर्धशतक झळकावणाऱ्या शुबमनने आपल्या खेळी दरम्यान सचिन तेंडुलकरला मागे टाकण्याची कामगिरी केली.

ईशान किशनच्या जागी संधी मिळालेल्या गिलने ही संधी साधली. त्याने श्रीलंकन गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. कर्णधार रोहित शर्मासह केवळ‌ 19.4 षटकात त्याने संघाला 143 धावांची भागीदारी करून दिली. त्याने बाद होण्यापूर्वी 60 चेंडूंमध्ये अकरा चौकारांच्या मदतीने 70 धावांची लाजवाब खेळी केली. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक ठरले.

या अर्धशतकासह पहिल्या 16 वनडे सामन्यात सर्वाधिक अर्धशतके झळकावणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये तो संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आला. भारताकडून पहिल्या 16 वनडे सामन्यात सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा खेळाडूंमध्ये राहुल द्रविड यांचा पहिला क्रमांक लागतो. त्यांनी यादरम्यान 7 अर्धशतके पूर्ण केली होती. तर, नवज्योत सिंग सिद्धू यांनी 6 वनडे अर्धशतके आपल्या पहिल्या 16 सामन्यात झळकावलेली. गिलआधी सचिन तेंडुलकर व केएल राहुल हे पहिल्या 12 सामन्यात 5 अर्धशतके पूर्ण करण्यात यशस्वी ठरलेले.

गिलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास दिसून येते की, त्याने 16 वनडे सामन्यांत 757 धावा केल्या आहेत. यामध्ये पाच अर्धशतके व एका शतकाचा समावेश आहे. आपल्या कारकिर्दीत तो आत्तापर्यंत दोन वेळा मालिकावीर देखील ठरलाय.

(Shubman Gill Hits Five Fifty For India In First 16 ODI)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पृथ्वी शॉचे झंझावाती शतक, वादळी खेळी करत बीसीसीआयच्या निवड समितीला फटकारले!
विराटची नजर सचिनच्या ‘त्या’ वर्ल्ड रेकॉर्डवर, श्रीलंकेविरुद्ध करणार का कमाल?


Next Post
Shubman Gill

गिलने टीकाकरांना केले शांत! चौकारांचा पाऊस पाडत 'या' यादीत श्रेयस, विराटला टाकले मागे

Photo Courtesy: Twitter/BCCI

वनडेत कोहलीच विराट! श्रीलंकन गोलंदाजांची पिसे काढत ठोकले 45 वे वनडे शतक

Suryakuamr Yadav Ishan Kishan

सूर्या आणि ईशानला ड्रॉप केल्यामुळे संतापले चाहते, सोशल मीडियावर रोहितसह संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143