भारतीय महिला क्रिकेट संघाने ७ वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्याने पुनरागमन केले आहे. या संघात जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती. या युवा खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यातील एक नाव म्हणजे स्नेहा राणा.
पाच वर्षानंतर भारतीय संघामध्ये परतलेल्या भारतीय महिला क्रिकेटपटू स्नेह राणा सध्या तिच्या शानदार खेळामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यात तिने दुसऱ्या डावात ८० नाबाद धावांची खेळी करत सामना अनिर्णित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
डेहराडूनमधील २७ वर्षीय खेळाडूने पदार्पणाच्या कसोटीत ५० हून अधिक धावा केल्या व व्यतिरिक्त चार विकेट घेतल्या. अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली आणि चौथी एकूण महिला खेळाडू ठरली आहे.
शेतकरी कुटुंबातून आलेल्या स्नेहची भारतीय संघात निवड झाली, त्यापूर्वी तिचे वडील भगवानसिंग राणा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. स्नेहची मोठी बहीण रुची वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाली, “वडिलांचे निधन झाल्यानंतर तिला खूप वाईट वाटले. पण तिने प्रशिक्षण सोडले नाही. प्रशिक्षण घेणं हे तिच्यासाठी दु:खाच्या वेळी आधार देणारं होतं. ”
स्नेह ५ वर्ष संघातून बाहेर होती. वयाच्या नवव्या वर्षी लिटिल मास्टर क्रिकेट अकादमीपासून तिने कारकिर्दीचा प्रारंभ केला. स्नेहला सिनौला येथे टॅलेंट सर्च कार्यक्रम स्पर्धेसाठी निवडण्यात आले. स्नेहचे प्रशिक्षण किरण आणि नरेंद्र साह यांनी केले. प्रशिक्षक किरण यांचे पती नरेंद्र साह म्हणाले, “आमच्यासमोर खेळायला तिला खूप लाज वाटत असे. आमचे अकॅडमीचे प्रशिक्षक किरणने तिला फलंदाजीसाठी खूप उत्तेजन दिले. ती प्रतिभाचा समुद्र आहे.”
तिच्या मेहनतीचे हे फळ
दुसरीकडे किरणने स्नेहचे कौतुक केले आणि म्हटले की “फादर्स डेच्या आदल्या दिवसापूर्वी अप्रतिम कामगिरी करुन तिने आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली. आमच्यासाठी हा खरोखर अभिमानाचा क्षण आहे. स्नेहसाठी वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. प्रशिक्षणासाठी वयाच्या नवव्या वर्षी ती माझ्याकडे आली.”
किरणने सुरुवातीच्या काही दिवसांची आठवण करून दिली आणि ती अष्टपैलू कशी झाली हे सांगितले. किरण यांच्या म्हणण्यानुसार, “आमच्या अकादमीमध्ये मुलींना मोठ्या मुलांविरुद्ध वेगवान गोलंदाजीचा सामना करावा लागतो. यामुळे तिचे क्रिकेटीचे कौशल्य सुधारले.”
स्नेह राणाची आश्चर्यकारक कामगिरी केली
इंग्लंडविरुद्ध सामन्याच्या पहिल्या डावात स्नेहने गोलंदाजीत ४ विकेट घेतल्या आणि त्यानंतर दुसऱ्या डावात तिने फलंदाजी करताना अप्रतिम अर्धशतक ठोकले. यासह स्नेहने इतिहास रचला. यापूर्वी कसोटीत भारताच्या पुरुष किंवा कोणत्याही महिला खेळाडूने ही कामगिरी केलेली नव्हती.
आठव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या स्नेहने दुसऱ्या डावात १३ चौकारांच्या मदतीने १५४ चेंडूत ८० धावांवर नाबाद राहिली. त्यामुळे फॉलोऑनची नामुष्की आलेली असतानाही भारतीय महिलांनी हा सामना अनिर्णित राखण्यात मोलाचा वाटा उचलला.
स्नेहने १२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत
सन २०१४ मध्ये प्रथमच भारतीय संघात स्थान मिळविणा स्नेहाने रेल्वेसाठी निवड होण्यापूर्वी हरियाणा आणि पंजाबकडून १९ वर्षांखालील सामने खेळले आहेत. स्नेहने आतापर्यंत ७ एकदिवसीय आणि ५ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
महत्वाच्या बातम्या
शमीच्या कव्हर ड्राईव्हमुळे थोडक्यात हुकली जेमिसनची हॅट्रिक, गोलंदाजाची रिऍक्शन होती पाहण्यासारखी
“गांगुली मला संघात घेण्यास इच्छुक नव्हता” भारतीय खेळाडूचा धक्कादायक खुलासा
‘केरळ एक्सप्रेस’ आता आपल्या अभिनयाने घेणार विकेट्स, झळकणार बॉलिवूडच्या ‘या’ सिनेमात